Chandrakant Patil Video : आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी! जीव धोक्यात घातला, बिबट्याला काठीनं मारलं

Chandrakant Patil Leopard Video : मुक्ताईनगरमध्ये बिबट्याला पकडताना केलेली स्टंटबाजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जीवावर बेदली असतील.
MLA Chandrakant Patil seen hitting a leopard with a stick in a viral video that has sparked controversy.
MLA Chandrakant Patil seen hitting a leopard with a stick in a viral video that has sparked controversy.sarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News : आमदाराची स्टंटबाजी त्यांच्याच जीवावर बेतली असती. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरातील बस स्थानक परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक प्रशासनासह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

बिबट्याला पकडण्यासाठी एक पिंजरा देखील लावण्यात आला होता. मात्र, पिंजऱ्यातून बिबट्या निसट्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली होती. बिबट्याला पकडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील मैदानात उतरले होते.

बिबट्याला डार्ट (बेशुद्धतेचे इंजेक्शन) मारण्यात आले होते. त्याच दरम्यान, बिबट्या निसटत असताना चंद्रकांत पाटील यांना बिबट्याला गाठीने मारले. बिबट्या त्यांच्यावर हल्ला देखील करत होता. त्यात ते किरकोळ जखमी देखील झाले. आमदार पाटील यांच्या बिबट्याला पकडण्याच्या स्टंटबाजी अंगलट आली असती मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, अशी चर्चा आहे.

MLA Chandrakant Patil seen hitting a leopard with a stick in a viral video that has sparked controversy.
Mahayuti power sharing dispute: महायुतीमध्ये धडधड वाढली! एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना; शिवसेना नाराज?

दरम्यान, बिबट्याला काठीने मारण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, बिबट्या एका व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता म्हणून त्याला काठीने मारले. तर, एकनाथ खडसे यांनी टीका करत म्हटले की, डार्ट मारले असताना बिबट्याला काठीने मारणे कायदेशीदृष्ट्या नियमबाह्य असून गुन्हा ठरू शकतो.

एका व्यक्तीवर बिबट्या हल्ला करण्याच्या तयारीत होता म्हणून आपण त्याला काठीने मारले. कौतुक करायचे सोडून खडसे टीका करत आहेत. ते विकृत आहेत हे त्यांचे राजकीय पोटदुखीचे राजकारण आहे.

MLA Chandrakant Patil seen hitting a leopard with a stick in a viral video that has sparked controversy.
Maratha protest cases : शासकीय संपत्तीचे नुकसान, सुप्रीम कोर्टाचे निर्देश! मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com