Vishal Patil, MP Sanjay Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Loksabha News : संजय पाटील कडाडले; विशाल पाटील या मैदानात, पळ काढू नका...

MP Sanjay Patil सांगली महापालिकेतील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार संजयकाका पाटील महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

Sangali Loksabha News : लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छक असलेले विशाल पाटील यांनी निवडणुकीसाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. 40 जणांची टीम काम करत आहे. पण, विशाल पाटील यांनी शेवटपर्यंत निवडणूक लढवावी, मैदानातून पळ काढू नये, असे आव्हान खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना विशाल पाटील यांना दिले.

सांगली महापालिकेतील Sangali Mahapalika विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार संजयकाका पाटील Sanjay Patil महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी अनेक जण मैदानात उतरत असतात.

राष्ट्रवादीने देखील सांगली विधानसभेची जागा मागितली असल्याचे ऐकले. त्यांची देखील अपेक्षा असू शकते. पण, काळ आणि लोकच उमेदवार निवडून देत असतात. काँग्रेसकडून शड्डू मारून उभे असलेले विशाल पाटील यांनी निवडणुकीपूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघात सर्व्हे सुरू केला आहे. चाळीस लोकांची टीम मतदारसंघात सर्व्हे करत आहे. पण त्यांनी शेवटपर्यंत निवडणूक लढवावी, मैदानातून पळ काढू नये.

संजयकाका म्हणाले, चिंतामणीनगर येथील उड्डाणपुलाला विलंब लागत आहे. या परिसरातील नागरिकांनी अंतर्गत मार्ग व ड्रेनेजची मागणी केली होती. त्याचा आराखडा व निधीबाबत जरा विलंब झाला. पण, आता काम सुरू आहे. रेल्वे विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी चर्चा झाली आहे. मार्चअखेरीपर्यंत पूल उभा करण्याची ग्वाही दिली आहे.

त्यामुळे हे काम तीन महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच वसगडे येथील शेतकर्‍यांनी पाच तास रेल्वे रोखली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासह इतर विषय मार्गी लागले असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले. कवलापूर येथील विमानतळाबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विमानतळासाठी 350 एकर जागा व फ्रिक्वेन्सीची आवश्यकता असते. कवलापुरची जागा 160 एकर आहे. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, डाळींब आदी शेती पिकांची निर्यात करण्यासाठी कृषी उड्डाण-दोनमधून विमानतळ व्हावे, अशी मागणी केली आहे. अधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा देखील झाली असून लवकरच सर्व्हे होणार असल्याचे खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT