MP Sanjay Patil: मंजुरी आधीच संजय पाटलांनी सांगितलं 'टेंभू'चे गुपित; बाबर अन् सुमनताई काय बोलणार?

Tembu Yojana News: आजचा दिवस सांगली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असेल, असे संजयकाका पाटील म्हणाले.
MP Sanjay Patil
MP Sanjay PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News: सांगली जिल्ह्यात टेंभू पाणी योजनेवरून राजकारण टोकाला गेले असताना आमदार सुमनताई पाटील यांनी विस्तारित टेंभू योजनेला मंजुरी मिळावी, यासाठी आंदोलन केले. आंदोलनापूर्वीच आमदार अनिल बाबर यांनी बाउन्सर टाकत याला मंजुरी आणली.

पण या टेंभू योजनेत आता खासदार संजय पाटील यांनी उडी घेतली आहे. उर्वरित सामना संपवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विस्तारित टेंभू योजनेला आज (गुरुवार) प्रशासकीय मान्यता मिळेल अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी दिली आहे.

14 डिसेंबर 2023 हा सांगली जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण दिन म्हणून नोंद होईल, आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंभू विस्तारित योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. मंगळवारी नागपूर येथे खासदार संजयकाकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्याबरोबर या विषयावर सखोल चर्चा केली.

यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंभू योजनेच्या विस्तारित योजनेला मान्यता देणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी दिली.

MP Sanjay Patil
Lok Sabha Security Breach: धमकी खरी ठरवल्यानंतर पन्नूने जाहीर केली संसदेतील घुसखोरांसाठी 10 लाखांची मदत

संजयकाका पाटील म्हणाले, "सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ,१ लाख २१ हजार ४७५ हेक्टर शेतीला पाणी देण्यासाठी विस्तारित टेंभू योजना मंजूर होणे आवश्यक होती. यासाठी लागणाऱ्या ७ हजार ३७० कोटी च्या खर्चास मान्यता,व अतिरिक्त ८ टीएमसी पाणी यासाठी आपण सातत्याने केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चितपणे या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळेल .ज्याचा थेट १ लाख २१ हजार ४७५ हेक्टरला फायदा होणार आहे.

विस्तारित टेंभू योजनेत कवठेमंहाकाळ, बेवनुर व आटपाडी कामथ तलाव गुरुत्वनलिका यांचा समावेश करण्यात आहे, ज्याचा थेट फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे . खानापूर मधील वंचित १५ ,आटपाडी १३ ,तासगाव १३,कवठेमहांकाळ ८,जत ४ अशा गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.

खासदार संजयकाका पाटील हे सातत्याने टेंभूच्या विस्तारित योजनेला मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. अधिकाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जिथे जिथे पाण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात कोणत्याही योजनेचे पाणी पोचले नाही तो सर्व भाग विस्तारित योजनेत समावेश होवून ओलीताखाली यावा ,यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

पाण्याविना कोणीही वंचित राहू नये, शेतीच्या बांधावर पाणी पोहोचावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. केवळ आपल्या जिल्ह्यासाठी नव्हे तर दुष्काळी पट्ट्यासाठी विस्तारित टेंभू योजना महत्त्वाची होती. अखेर आज या योजनेला आज प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. आजचा दिवस सांगली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असेल, असे संजयकाका पाटील म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

MP Sanjay Patil
Lok Sabha Security Breach: संसदेत घुसखोरी: सहा जणांनी गुरुग्राममध्ये कट रचला..मास्टरमाईंड कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com