Shivendraraje Bhosale, Sanjay Raut
Shivendraraje Bhosale, Sanjay Raut sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : राजकिय पोळी भाजण्यासाठीच राऊतांची राजघराण्यावर टीका : शिवेंद्रराजे

Umesh Bambare-Patil

Satara News : छत्रपती संभाजीराजेंना टाळून संजय पवारांना राज्यसभेचे तिकिट देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम उद्धव ठाकरेंनी Udhav Thackeray केले. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्याविषयी त्यांचे किती प्रेम हे दिसते. त्यांना आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही. भाजपवर निशाणा साधण्यासाठी साताऱ्यात आल्यावर आमच्या राजघराण्यावर राऊत बोलत आहेत. विकास कामांसह राजकारणावर बोलायला त्यांच्याकडे काही राहिलेले नाही. म्हणून राजघराण्यावर बोलून कार्यकर्त्यांच्या भावनांना हात घालून राजकिय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी केली आहे.

काल (शुक्रवार) साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि छत्रपती घराण्यावर टीका केली होती. ज्या भाजप पक्षात तुम्ही आहात त्यांना छत्रपती घराण्याबद्दल आदर नसल्याचे सांगत हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते आता पंत नेमणुका करायला लागले आहेत, अशी खोचक टीका केली होती.

त्याला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी प्रतिउत्तर दिले आहे. छत्रपतींबद्दल संजय राऊत आणि उद्धव साहेबांची शिवसेना यांना आदर आहे. तर कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेचे तिकिट का दिले नाही. तो मान सन्मान ठेवायचा होता. संजय पवार यांना तिकिट देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यातूनच तुमचे छत्रपतींच्या घराण्याविषयी किती प्रेम आहे हे दिसते.

या माणसाला घराण्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी बोलणं टाळावे. यापूवीची त्यांची वक्तव्ये काय होती. भाजपवर निशाणा साधायचा असेल तर आमच्यावर बोलायचे. साताऱ्यात आल्यावर आमच्यावर बोलायचे कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी भडक बोलायचे हा त्यांचा उद्देश आहे. आता संजय राऊतांच्या वक्तव्याला कोणी महत्व देत नाही.

एखाद्या व्यक्तीकडे कर्तृत्व असेल आणि नेतृत्व करण्याची क्षमता असेल तर जात, पात धर्म याकडे बघायची गरज नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे कामही श्री. फडणवीस यांनी केले. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांना आरक्षण देता आले नाही, पण त्यांनी दिले होते. जनतेची नेतृत्वाला मान्यता असेल तर जात, पात धर्म पाहिला जात नाही. कर्तृत्व महत्वाचे असून देशातील कर्तृत्ववान नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिजे जाते, असे त्यांनी स्‍पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT