Satara : नारळ फोड्यांची गॅंग साताऱ्यात पुन्हा सक्रिय... शिवेंद्रसिंहराजेंची टीका

Shivendraraje Bhosale खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी हद्दवाढ झालेल्या भागात विकास कामांचे भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. यावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सडतोड टीका केली
MLA Shivendraraje Bhosale, MP Udayanraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosale, MP Udayanraje Bhosalesarkarnama

Satara News : सातारा पालिकेच्या Satara Palika हद्दवाढीच्या भागातील लोकांना नागरी सुविध देण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडून निधी मंजूर करुन आणलेला आहे. पण, मी अधिवेशनात असल्याचे पाहून पुन्हा ही नारळ फोड्यांची गॅंग साताऱ्यात सक्रिय झाली आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी खासदार उदयनराजेंवर Udayanraje Bhosale केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी हद्दवाढ झालेल्या भागात विकास कामांचे भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. या वर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सडतोड टीका केली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, हद्दवाढीतील नवीन भागातील विकास कामांसाठी ४८ कोटींचा निधी आम्ही अजित पवारांकडे पाठपुरावा करुन मिळवला आहे.

त्यावेळी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी हद्दवाढीला विरोध केला होता. त्यांच्या विरोधामुळे हद्दवाढीचा प्रश्न दोन वर्षे रखडला. ज्यांना हद्दवाढ नको होती, तेच आता आम्हीच निधी आणला म्हणून सांगत आहेत. मुळात हा निधी आमदार फंडातून आलेला आहे. हद्दवाढीत आलेल्या लोकसंख्येच्या नागरी सुविधांसाठी हा निधी आहे. पण, कामे मंजूर झाली की लगेच नारळ फोड्यांची गॅंग तयारच असते.

MLA Shivendraraje Bhosale, MP Udayanraje Bhosale
Satara : माथाडी नेते कामगार मंत्र्यांवर नाराज; दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा

हे काम आम्ही केलं म्हणायचं आणि श्रेय घ्यायचे. खासदारांनी केंद्रातून एक रुपयाचाही निधी आणलेला नाही. सर्व काही राज्य सरकारकडून प्रयत्न करुन आम्ही आणलेले आहे. केवळ सोशल मीडियावर फोटो टाकला म्हणजे कामांना मान्यता मिळत नाही. नागरीकांना आता सर्व काही माहिती झालं आहे.

MLA Shivendraraje Bhosale, MP Udayanraje Bhosale
Satara : शाळा शिकू का शेत राखू... परळी खोऱ्यातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा

कोणीही नारळ फोडू देत आपण त्यांना आडवू शकत नाही. राज्य सरकारकडून आमदार म्हणून हे काम आम्ही केलेले आहे. मी अधिवेशनात होतो, त्यामुळे काहींनी कामांच्या भूमिपूजन करण्याचा चटका करुन घेतला. आम्ही आमच्या कामांचे नारळ फोडणार असतो. खासदार फंडातून झालेल्या कामांचे नारळ आम्ही फोडत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

MLA Shivendraraje Bhosale, MP Udayanraje Bhosale
Satara News : अमित ठाकरेंना 'हा' परफ्यूम भेट देत उदयनराजे म्हणाले, "आता मोठ्या माणसासारखे.."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com