Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Paresh Kapase
पश्चिम महाराष्ट्र

मराठी माणसांशी केलेल्या बेईमानीची किंमत संजय राऊतांना चुकवावीच लागेल

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पत्रा चाळ विकास प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून ( ईडी ) आज कारवाई करण्यात आली. या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी संजय राऊत व शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिर्डी येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ( Sanjay Raut will have to pay the price for his dishonesty with Marathi people )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पत्रा चाळीचा विकास करण्याच्या नावाखाली इथल्या मराठी माणसाशी आणि महाराष्ट्राशी केलेल्या बेईमानीची किंमत संजय राऊत यांना चुकवावीच लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, पत्राचाळीच्या घोटाळ्याबाबत जी माहीती माध्यमातून पुढे येत होती तेव्हाच या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले होते. मात्र मी डरपोक नाही अशा वल्गना करणारे संजय राऊत हे ईडीने चौकशी करीता बोलावूनही न जाता स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. आता खऱ्या अर्थाने दूध का दूध और पानी का पानी होईल, असे त्यांनी सांगितले.

पत्राचाळीच्या विकास करण्याच्या नावाखाली मराठी माणसाची फसवणूक करून संजय राऊत यांनी महाराष्ट्राशीच बेईमानी केली असल्याचा थेट आरोप करून आमदार विखे म्हणाले की झुकेगा नही म्हणणारे संजय राऊत यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेण्याची आलेली वेळ ही निष्ठावान सैनिकांशी केलेली बेईमानी म्हणावी लागेल. विचारांशी प्रतारणा करून शिवसेना ज्यांच्या दावणीला बांधायला तुम्ही निघाला होता. त्यातून खरा शिवसैनिक आता वाचला आहे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही त्यामुळे भावनिक विधान करून जनतेची दिशाभूल करू नका इमानदारीची मुक्ताफळं आता जेलमधून उधळावीत आणि फावल्या वेळात शेरोशायरी करायला भरपूर वेळ असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.

कायद्यापुढे कोणी मोठे नाही. मात्र ईडीने केलेल्या कारवाईवर जे आज कोणी बोलत आहेत त्यांनी या राज्यात मागचे अडीच वर्ष ज्या पध्दतीने सत्तेचा दुरुपयोग करून सामान्य माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न केला याचा विसर त्यांना आता पडला आहे. काँग्रेसला सत्तेत असतानाही किंमत नव्हती. त्यामुळे आज त्यांनी केलेल्या वक्तव्याला फारसे महत्व देत नसल्याचे विखे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT