वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांचा भविष्यात हिशेब होणार - सुजय विखे

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilSarkarnama

अहमदनगर - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालयातर्फे संगमनेर तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेतून जीवनावश्यक साहित्याचे वितरण खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली. ( Those stuck in sand and transfer money will be held accountable in the future - Sujay Vikhe )

वयोश्री योजनेतून आज संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, चिंचपूर गोगलगाव, सादतपूर या गावांमधील ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे, शांताराम जोरी, अॅड. रोहिणी निघुते, दीपाली डेंगळे सुजाता थेटे, गुलाबराव सांगळे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे, गिताराम तांबे, अमोल थेटे, रामप्रसाद मगर आदी उपस्थित होते.

Dr. Sujay Vikhe Patil
रोहित पवारांच्या वक्तव्यावर सुजय विखे म्हणाले : फडणवीस हे तरूण, तेच योग्य निर्णय घेतील

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे डोंगर उभे करणाऱ्या मंत्र्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते. वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारल्या मात्र सर्वसामान्य माणसाला काय दिले ? या सर्वांचाच हिशोब भविष्यात होणार आहे. मात्र संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या मागे खंबीरपणे उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीने काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. राज्यातही आता शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आल्याने राज्यात पुन्हा नव्याने विकासाची प्रक्रिया सुरू होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे, रावसाहेब दानवे, सुभाष देशमुखांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन : साधला वारकऱ्यांशी संवाद

राज्यात महाविकासआघाडी सरकारच्या काळात फक्त भ्रष्टाचार वाढला. वाळू माफीया आणि बदल्यांचे रॅकेट खुलेआम कार्यरत होते. यातून मिळालेल्या पैशाचा वापर सहकारी संस्थांच्या निवडणुकात करण्यात आला. मात्र जनतेला सर्व माहिती आहे. पैशाच्या जीवावर राजकारण करण्याचे दिवस आता संपलेत. भविष्यात जनता याचा हिशोब करणार. विकासाच्या फक्त गप्पा मारणाऱ्यांनी कोरोना संकटात जनतेकडे दुर्लक्ष केले, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com