Sanjay Raut, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai Criticized Raut: नको तिथं नाक खूपसण्याची राऊतांची जुनी सवयी : शंभूराज देसाईंचा टोला

Shambhuraj Desai On Sanjay Raut: शंभूराज देसाई यांनी राऊत यांना खोचक उत्तर दिले आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News: आमच्या घरातलं आम्ही बघू, नको तिथ नाक खूपसू नका. ही राऊतांची ही जुनी सवयी आहे. आम्ही सभागृहात १७० चे बहुमत दोन वेळा सिद्ध केले आहे. पुन्हा प्रस्ताव आला तरी १८०, १८५ चे बहुमत विधानसभेत सिद्ध करू असा दावा करुन आमची युती भक्कम आहे. दिल्लीतील गोष्टी समजायला संजय राऊत Sanjay Raut हे काय अंतरयामी आहेत का. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून... अशी अवस्था राऊतांची झाली आहे, अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी केली आहे.

मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचालींवर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. भाजपला बळ देण्यात सध्याचे मुख्यमंत्री अपयशी ठरले अशी टीका त्यांनी केली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांना खोचक उत्तर दिले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, दिल्लीतील गोष्टी समजायला संजय राऊत हे काय अंतरयामी आहेत का. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून... अशी अवस्था राऊत यांची आहे. शरद पवार यांनी काल एक वक्तव्य केलं होतं. २०२४ ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल का ते आत्ताच सांगता येणार नाही. महाविकास आघाडी उभारण्यात पवार यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

या वक्तव्यापासून राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांना बदलायच्या हालचाली सुरु आहेत, असे सांगत आहेत. आमच्या घरातलं आम्ही बघू, नको तिथ नाक खूपसू नका. ही राऊतांची ही जुनी सवयी आहे. आम्ही सभागृहात १७० चे बहुमत दोन वेळा सिद्ध केले आहे. पुन्हा प्रस्ताव आला तरी १८० ,१८५ चे बहुमत विधानसभेत सिद्ध करू असा दावा देसाई यांनी केला.

आमची युती भक्कम आहे. भाजपच्या मोठ्या नेतृत्वांनी वेळोवेळी सांगितले आहे की, २०२४ पर्यंत ही युती कायम राहणार आहे. आधी तुमच्या घरात काय चाललंय बघा, स्वत: पक्षाच्या व्यासपीठावर देान तीन मिनिटापेक्षा जास्त वेळ बोलून दिले जात नाही. संजय राऊतांना आमच्यात डोकावण्याचे कारण नाही. तुमच्यात काय चाललंय ते बघा मग आमच्यात डोकावा, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT