Gulabrao Patil On Raut : ...तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाही!, गुलाबरावांनी राऊतांना फटकारलं आणि दिलं 'हे' आव्हान..

Jalgaon Political News : तुमचा व्याही कलेक्टर असताना तिकडे काय काय झाले? हे ही आम्हाला माहितीय...
Sanjay Raut| Gulabrao Patil
Sanjay Raut| Gulabrao PatilSarkarnama

Jalgaon : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोरोना काळात 400 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता गुलाबराव पाटील आक्रमक झाले आहेत त्यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर पलटवार केला आहे.

शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध खासदार संजय राऊतांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. पाटील म्हणाले, जळगाव जिल्ह्यात 190 कोटी खर्च करावे असे शासनाचे आदेश होते. त्यापैकी आम्ही 121 कोटीला मान्यता केली आणि 90 कोटी वितरित केले होते.

आणि 3 वर्षात फक्त 81 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली होती. ज्या ठिकाणी तीन वर्षात 81 कोटी रुपये खर्च होत आहेत. तिथे 400 कोटीचा घोटाळा होईलच कसा अशी विचारणा पाटील यांना राऊतांना केला आहे.

Sanjay Raut| Gulabrao Patil
Sanjay Raut On CM Shinde: ''...म्हणून एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार!''; ठाकरे गटाच्या संजय राऊतांचा नवा बॉम्ब

तुमचा व्याही कलेक्टर...

तुमचा व्याही कलेक्टर असताना तिकडे काय काय झाले? हे ही आम्हाला माहितीय असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तसेच राऊतांना माझं चॅलेंज आहे, त्यांनी तीन महिन्यात चौकशी करावी. मी बॉन्ड लिहून देतो, जर चौकशीत दोषी आढळलो तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाही, नाहीतर त्यांनी खासदारकीचे राजीनामा द्यावा. असं खुलं आव्हानच गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी दिलं आहे.

संजय राऊतांचे आरोप काय?

उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या पाचोरा येथील सभेआधीच खासदार संजय राऊतांनी राजकीय वातावरण तापवलं होतं. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप केले होते. राऊत म्हणाले, जळगावमध्ये गुलाबो गॅंग आहे. ज्यांनी ५० कोटी रुपये घेऊन शिवसेना सोडली. हे लोक शिवसेनेच्या मेहेरबानीने निवडून आले आणि मग विकले गेले. ते आज आम्हांला धमक्या देत आहेत. पण जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. येथील काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले अशी बोचरी टीका राऊत यांनी केली होती.

Sanjay Raut| Gulabrao Patil
BJP News : भाजपनं करुन दिली ठाकरेंना बहिणाबाईंच्या त्या ओळीची आठवण ; "इमानाले इसरला त्याले नेक ..,

४०० कोटी रुपयांचा आरोप...

राऊत म्हणाले, यांनी माझ्याकडे गुलाबराव पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. कोरोना काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होती. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचं व्हेंटीलेटर १५ लाखांना खरेदी केले गेले. महत्त्वाचे म्हणजे या भ्रष्टाचारावर त्याच गॅंगचे सदस्य चिमनराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. हा घोटाळा साधारण ४०० कोटी रुपयांचा आहे. मात्र, हे प्रकरण दाबलं जात आहे, असे ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com