Sanjay Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Shinde : ...तर 'आदिनाथ'ला नक्कीच मदत करीन; संजय शिंदेंचे सूचक वक्तव्य

Solapur News :आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून राजकारण रंगले  

Harshal Bagal

Karmala News:आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा करमाळा तालुक्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सोबत नेहमीच राहिलो असून, कारखान्याबाबत कधीच राजकारण केले नाही. आणि भविष्यात गरज पडल्यास मी नक्कीच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत करेन, असे मत आमदार संजय शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बारामती अॅग्रोकडे जाण्याचा अंदाज दिसत असताना, मंत्री तानाजी सावंत यांनी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात युती घडवून आणली. त्यानंतर काही दिवसांतच विधानसभेच्या मुद्द्यावरून त्यांच्यात मतभेद दिसले. त्यानंतर कारखान्यावर प्रशासनाची नेमणूक करण्यात आली आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, अधिकारी व संचालक मंडळ यांच्या गैरकारभारामुळे तालुक्यामधील ऊस उत्पादकांचा कारखान्यावरील विश्वास उडाल्याने शेतकऱ्यांनी कारखान्याकडे पाठ फिरवली आहे.  त्यामुळे सध्या कारखाना सुरळीत चालू ठेवणे हे प्रशासकासमोर मोठे आव्हान आहे. इतरांनी आदिनाथला सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, याबाबत आमदार संजय शिंदे यांनी आदिनाथच्या बाबतीत सूचक वक्तव्य केले आहे. 

शिंदे म्हणाले, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे जी काय थकबाकी आहे. त्याच्या संदर्भात तहसीलदार, सोलापूर जिल्हाधिकारी आणि सहकार साखर आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. जिल्ह्यातील सर्व कारखाने हे सध्या 100 टक्के कपॅसिटीने चालत नाहीत. याचा फटका सर्व कारखान्याला बसत आहे. जर माझ्या कारखान्याची यंत्रणा जर शिल्लक राहिली किंवा ऊस माझ्याकडे जास्त येत असेल, तर मी नक्कीच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत करेन आणि येणाऱ्या काळातसुद्धा आदिनाथ बाबतीत पाठपुरावा करण्यामध्ये कुठेही मागे पुढे बघणार नाही, असे देखील आश्वासन शिंदे यांनी दिलेले आहे.

(Edited by Sudesh Mitkar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT