Ashok Chavan News : तेलंगणात शंभर टक्के काँग्रेसचे सरकार, अशोक चव्हाणांची गॅरंटी...

Congress News : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि बीआरएसच्या तेलंगणाबाहेरच्या विस्ताराला ब्रेक लागला.
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या राज्यात शंभर टक्के काँग्रेसचे सरकार येणार, असा दावा पंधरा विधानसभा मतदारसंघांच्या प्रचाराची जबाबदारी असलेले महाराष्ट्रातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. (Telangana Assembly Election) केवळ दावाच नाही तर तशी गॅरंटी अशोक चव्हाण प्रचार सभांमधून देत आहेत.

Ashok Chavan News
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोण करतंय ? पुन्हा तोच प्रकार...

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashkhar Rao) यांच्या बीआरएस पक्षासमोर काँग्रेसने मोठे आव्हान उभे केले आहे. काही महिन्यांपूर्वी याच केसीआर यांनी बीआरएस पक्षाच्या विस्तारासाठी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेड जिल्ह्याची निवड केली होती. काही वर्षांपूर्वी हैदराबादेतील एमआयएमने नांदेड मार्गे महाराष्ट्रात आणि नंतर देशात आपल्या पक्षाचा विस्तार केला.

याचा सर्वाधिक फटका हा काँग्रेस (Congress) पक्षाला बसला होता. त्याचीच पुनरावृत्ती केसीआर यांचा बीआरएस पक्ष नांदेड मार्गे दाखल होऊन करू पाहत आहे. महाराष्ट्रात केसीआर यांच्या बीआरएस पक्षाने मोठी वातावरण निर्मिती केली होती. मराठवाडा आणि राज्यातील अनेक प्रस्थापित पक्षांतील नेत्यांचे भव्य प्रवेश सोहळे, केसीआर यांच्या जाहीर सभा, पंढरपूर, कोल्हापूर येथील दर्शनाच्या निमित्ताने केलेले शक्तिप्रदर्शन यामुळे बड्या पक्षांनी केसीआर यांचा धसका घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि बीआरएसच्या तेलंगणाबाहेरच्या विस्ताराला ब्रेक लागला. या निवडणुकीच्या निमित्ताने केसीआर यांच्या बीआरएसला तेलंगणातच रोखणे, सत्तेवरून पाय उतार करणे, यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे. यात मोठी जबाबदारी ही अशोक चव्हाण यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अशोक चव्हाण गेल्या महिनाभरापासून तेलंगणा राज्यात सक्रिय आहेत.

त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करत अशोक चव्हाण यांनी केसीआर यांना जोरदार टक्कर दिली आहे. तेलंगणामध्ये शंभर टक्के काँग्रेसचे सरकार येणार याची गॅरंटीच ते प्रचार सभांमधून देताना दिसत आहेत. आपल्या पक्षाचा महाराष्ट्रातून देशभरात विस्तार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या केसीआर यांच्या बीआरएसची सत्ता उखडून त्यांचे मनसुबे उधळण्यासाठी अशोक चव्हाण महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, एवढे मात्र निश्चित.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com