Sanjay shinde
Sanjay shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Shinde : त्या दुर्लक्षित 30 गावांचा विषय गाजणार अधिवेशनात...

Harshal Bagal

Karmala News : हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरती आमदार संजय शिंदे यांनी उजनी पुनर्वसित गावांच्या समस्यांबाबत बैठक बोलावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ३० पुनर्वसित गावांतील विविध समस्या प्रलंबित आहेत. या समस्या जाणून घेऊन त्या अधिवेशनात मांडल्या जाण्याची खूप दाट आहे. त्यामुळे 18 विविध योजनांचा लाभ या 30 गावांना मिळण्यास मदत होणार आहे.

उजनी धरणाच्या बांधकामानंतर करमाळा तालुक्यातील 30 गावे पुनर्वसित झालेली आहेत. या गावांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन विभागाकडून 18 नागरी सुविधांचा लाभ मिळणे आवश्यक होते. त्यापैकी अनेक गावांमध्ये अद्यापही हे लाभ मिळालेले नाहीत.

या गावांच्या समस्यांबाबत सोमवार, दि. 4 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता पंचायत समिती सभागृह करमाळा येथे जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलावली असल्याची माहिती करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

ही बैठक 20 ऑक्टोबर 2023 रोजी होणार होती, परंतु ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे ही बैठक स्थगित करण्यात आलेली होती. नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

करमाळा विधानसभेचे आमदार संजय शिंदे यांनी जानेवारी 2023 मध्ये आमदार आपल्या दारी संपर्क अभियानांतर्गत करमाळा तालुक्यांमध्ये गावभेट दौरा आयोजित केला होता. या गावभेट दौऱ्यात प्रत्येक गावातून आलेल्या समस्यांची नोंदणी केली गेली होती.

विशेषतः उजनी धरणाच्या बांधकामानंतर करमाळा तालुक्यातील पुनर्वसित गावातील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. या समस्या सोडवण्यासाठी पुनर्वसन विभागाकडे जून 2023 मध्ये पत्रव्यवहार केला होता.

त्यानुसार आता बैठक बोलावली असून, या बैठकीसाठी वांगी नं.1, वांगी नंबर 2, वांगी न. 3, वांगी नं. 4, भिवरवाडी, दहिगाव, बिटरगाव, कुगाव, चिखलठाण नं.1, चिखलठाण न. 2, ढोकरी, पारेवाडी, केतूर नं.1, केतूर नंबर 2, पूर्व सोगाव, पश्चिम सोगाव,उंदरगाव, गोरेगाव, रिटेवाडी, कविटगाव, सांगवी क्र.1, सांगवी क्र.2, कंदर, पोमलवाडी, खातगाव नं.1, खातगाव नं.2, कात्रज, नेमतवाडी, टाकळी, कोंढार चिंचोली या गावांतील नागरिक उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT