Chandrahar Patil And Sanjay Shirsat sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrahar Patil : चंद्रहार पाटलांनी संजय शिरसाट यांना अक्षरश: तोंडावर पाडले... पक्षप्रवेशाचा मुहूर्त अन् आव्हानातील हवाच काढली!

Chandrahar Patil On Sanjay Shirsat : विधानसभा निवडणुका झाल्यापासून ठाकरे गटाला राज्यभर खिंडार पडण्यास सुरूवात झाली आहे. हे हादरे अद्याप थांबलेले नाहीत. अशातच सांगलीत देखील लोकसभेला उमेदवारी दिलेला नेताच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

Aslam Shanedivan

Sangali News : डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट अक्षरशः तोंडावर पडले आहेत. संजय शिरसाट यांनी चंद्राहार पाटील यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख जाहीर केली आणि पक्षप्रवेश थांबवण्याचे आव्हानही दिले. पण काही मिनिटातच पाटील यांनी एक पोस्ट करत अद्याप आपला निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे शिरसाट यांची घोषणा आणि आव्हान हे फुसका बार ठरला.

चंद्राहार पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी सांगलीच्या भाळवणीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांचा चांदीची गदा देऊन सत्कार केला होता. याआधीही त्यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. श्रीकांत शिंदे यांनीही पाटील यांच्या प्रवेशाचे संकेतही दिले होते. यानंतर आता शिरसाट यांनी थेट पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीखच जाहीर आणि त्यांचा पक्षप्रवेश रोखून दाखवा असेही आव्हान दिले.

शिरसाट म्हणाले, सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होणार आहे. येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा अनेक मोठ्या लोकांचा प्रवेश होणार आहे. डबल केसरी चंद्रहार पाटील यांचाही प्रवेश होणार आहे. त्यांचा सोमवारी (9 जून) शिवसेनेत प्रवेश होणार आहे. हिंमत असेल तर थांबवून दाखवा. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत कोणीही राहण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, असाही टोला शिरसाट यांनी नाव न घेता संजय राऊत यांना लगावला आहे.

त्याचवेळी चंद्रहार पाटील यांनी एक पोस्ट करत शिरसाट यांचा दावा खोडून काढला. माझ्या पक्षप्रवेशाबाबत, मी अद्याप अधिकृत भूमिका घेतलेली नाही. शिवसेनेकडून नक्कीच मला ऑफर आहे. पण पक्ष प्रवेश करायचा की नाही, उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडायची की नाही, याबाबत अद्याप विचार झालेला नाही. मी सध्या बाहेर गावी असून कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांशी संवाद साधल्यावरच पुढचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT