Chandrahar Patil Shivsena : उदय सामंतांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या नेत्याची हजेरी; चांदीची गदा देवून सत्कारही!

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray leader Chandrahar Patil attended meeting Sangli and Shiv Sena minister Uday Samant : सांगली जिल्ह्यत सध्या पक्ष प्रवेशांना उत आला असून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
Chandrahar Patil
Chandrahar PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात आगामी स्थानिकच्या तोंडावर पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत माजी आमदारांसह जिल्ह्यातील काही प्रमुख चेहऱ्यांनी प्रवेश केला होता.

यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आले असून सत्काराच्या घटनेमुळे पक्ष प्रवेश लवकरच होईल अशाही चर्चा होताना दिसत आहेत.

डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. सांगलीच्या भाळवणीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटलांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी चंद्रहार पाटलांकडून मंत्री सामंत यांना चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना (Shivsena) मंत्री उदय सामंत यांनी, चंद्रहार पाटील यांनी आम्हाला हार घातला. पण आम्ही त्यांना कधी हार घालायचं की नाही हे एकनाथ शिंदे साहेबांनाच ठरवावं लागणार आहे. तर ते चंद्रहार पाटलांच्या गळ्यात कधी हार घालणार हे देखील तेच ठरवतील, असे बोलत टायमिंग साधला.

Chandrahar Patil
Jayant Patil Politics : जयंत पाटलांच्या 'त्या' कृतीनं उडाला राजकीय धुरळा; पुन्हा महायुतीत जाण्याच्या चर्चांना उधाण

या सत्कारामुळेच चंद्रहार पाटलांच्या प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पण चंद्रावर पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर उदय सामंत यांनी विधान केल्यानं नेमकं काय सुरू आहे, असाही सवाल आता जिल्ह्यातील शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत होत आहे.चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार होते. पण गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या.

Chandrahar Patil
Mumbai Police Transfers: 'BMC' निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पोलिस दलात मोठी उलथापालथ; एकाचवेळी 13 उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश

याआधी देखील चंद्रहार पाटलांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीत भेट घेतली होती. उदय सामंत यांच्याबरोबर स्नेहभोजनावर ताव ही मारला होता. तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर काही फोटोही त्यांचे व्हायरल झाले होते. तर श्रीकांत शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांचे कौतुकही केलं होते. ज्यानंतर चंद्रहार पाटील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते.

दरम्यान आता पुन्हा एकदा चंद्रहार पाटील उदय सामंत यांच्याबरोबर दिसून आले असून त्यांनी सामंत यांचा सत्कारही केला आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर पैलवान चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com