Mahesh Shinde, Eknath shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon : महेश शिंदेकडून सहा कोटींची संक्रांत भेट...

CM Eknath shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोरेगाव मतदारसंघासाठी निधी मंजूर केलाआहे.

Umesh Bambare-Patil

Koregaon News : आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांच्या विशेष प्रयत्नामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी कोरेगाव मतदारसंघासाठी नागरी सुविधा पुरविणे आणि जनसुविधांसाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान देण्याच्या योजनेतून पाच कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत. संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार शिंदेंनी मतदारसंघाला विकासकामांच्या रुपाने अभिनव भेट दिल्याचे बोलले जात आहे.

मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणे या योजनेतून खेड (सातारा) येथे दहा लाख, वसंतनगर येथे १५ लाख, कोडोलीसाठी २५ लाख रुपये, संभाजीनगरसाठी २५ लाख रुपये असे सातारा तालुक्यातील विकासकामांसाठी ७५ लाख रुपये मंजूर केले.

खटाव तालुक्यात पुसेगावसाठी २५ लाख, खटावसाठी ४० लाख असे ६५ लाख रुपये मंजूर केले. जनसुविधांसाठीच्या योजनेतून सातारा तालुक्यात ब्राम्हणवाडीसाठी १५ लाख, मर्ढेसाठी १५ लाख, जैतापूरसाठी दहा लाख, मालगावसाठी १५ लाख, महागावसाठी १५ लाख, चिंचणेर संमत निंब येथे ३० लाख, मालगावसाठी दहा लाख, निगडीसाठी दहा लाख, वर्णेसाठी १५ लाख व जाधववाडीसाठी दहा लाख रुपये असा एक कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

खटाव तालुक्यात जाखणगावसाठी १५ लाख, नवलेवाडीसाठी दहा लाख, फडतरवाडी (बुध) साठी दहा लाख, कटगुणसाठी १५ लाख, दरुजसाठी दहा लाख, गादेवाडी साठी १५ लाख, बिटलेवाडीसाठी १५ लाख, निढळसाठी १५ लाख, ललगुणसाठी १५ लाख, रेवलकरवाडीसाठी (विसापूर) दहा लाख, खटावसाठी तीन लाख रुपये असे एक कोटी ३३ लाख रुपये मंजूर केले.

कोरेगाव तालुक्यात चिमणगावसाठी १५ लाख, बोबडेवाडीसाठी दहा लाख, किन्हईसाठी दहा लाख, आझादपूरसाठी १५ लाख, बर्गेवाडीसाठी १५ लाख, अंबवडे संमत कोरेगावसाठी १५ लाख, जरेवाडीसाठी दहा लाख, मंगळापूरसाठी १५ लाख, कुमठेसाठी सात लाख, रामोशीवाडीसाठी दहा लाख, घाडगेवाडीसाठी दहा लाख, विठ्ठलवाडीसाठी (अंबवडे संमत कोरेगाव) दहा लाख, भिवडीसाठी १५ लाख, तर तडवळे संमत कोरेगावसाठी दहा लाख रुपये असे एक कोटी ६७ लाख रुपये मंजूर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT