Koregaon : सातारा-पाथर्डी महामार्गाचे काम रखडले; कोरेगावात राष्ट्रवादीचा 'रास्ता रोको'

Tejas Shinde जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
NCP Andolan
NCP Andolansarkarnama
Published on
Updated on

Koregaon News : सातारा - पाथर्डी महामार्गाचे काम कोरेगाव शहरात रखडल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. प्रचंड प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. पादचाऱ्यांची चालताना होत असलेल्या कसरतीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या Nationalist Congress वतीने आज कोरेगाव शहरातील जुना मोटार स्टँडवर रास्ता रोको आंदोलन करून प्रांत, तहसीलदारांना निवेदन दिले. तसेच तातडीने काम पूर्णत्वास न्यावे, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा संजना जगदाळे, शिवाजीराव महाडिक, प्रतिभा बर्गे, श्रीमंत स. झांजुर्णे, श्रीमंत नि. झांजुर्णे, अरुण माने, ॲड. प्रभाकर बर्गे, संजय पिसाळ, डॉ. गणेश होळ, संजीवनी बर्गे, हेमंत बर्गे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी ११ च्या सुमारास जुना मोटार स्टँडवर तेजस शिंदे हे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. सातारा ते पंढरपूर रस्त्यांचे काम झालेच पाहिजे, पन्नास खोकी एकदम ओके, भ्रष्टाचारी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय... आदी घोषणा देत 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू होताच दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लावून रस्त्याची वाहतूक बंद पडली.

NCP Andolan
Koregaon : कोरेगावात चक्क पाच सभामंडप चोरीला... महेश शिंदेंचा गौप्यस्फोट

बराच काळ घोषणाबाजी झाल्यावर पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना मागणीचे निवेदन देण्यासाठी तहसीलदार कचेरीकडे नेले. त्यानंतर सर्व कार्यकर्ते तहसील कचेरी, तेथून प्रांताधिकारी कार्यालयात गेले. दोन्ही ठिकाणी निवेदन देऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

NCP Andolan
साताऱ्याच्या दोन राजांना शशीकांत शिंदे दणका देणार?

आंदोलनात मंदाकिनी बर्गे, संगीता बर्गे, माधुरी चव्हाण, ॲड. पांडुरंग भोसले, प्रतापराव निकम, नाना भिलारे, अजय कदम, किशोर बर्गे, सचिन बर्गे, अजित बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, फरदीन मुजावर, सनी शिर्के, अमरसिंह बर्गे, नितीन लवंगारे, नवनाथ बर्गे, विवेक चव्हाण, वैभव जगदाळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

NCP Andolan
Satara News : सातारा मेडिकल कॉलेजमधील भंगार विक्रीचा मुद्दा विधानपरिषदेत; आता होणार चौकशी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com