Satara SP Action on Gang sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : बकासूर गँगच्‍या म्‍होरक्‍यासह १६ जणांना ‘मोक्का’

Crime खुनाचा प्रयत्‍न, धमकावणे, खंडणी वसूल करणे आदी गंभीर स्‍वरूपाचे गुन्‍हे बकासूर गँगचा म्‍होरक्‍या यश नरेश जांभळे (रा. शाहूपुरी) याच्‍यासह त्‍याच्‍या साथीदारांवर होते.

सरकारनामा ब्युरो

सातारा : विविध गंभीर गुन्‍हे दाखल असणाऱ्या साताऱ्यातील बकासूर गँगचा म्‍होरक्‍या यश नरेश जांभळेसह त्‍याच्‍या १६ साथीदारांविरोधात ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्‍यात आल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.

कोयत्‍यासह धारदार शस्‍त्रांचा वापर करत दहशत पसवरत खुनाचा प्रयत्‍न, धमकावणे, खंडणी वसूल करणे आदी गंभीर स्‍वरूपाचे गुन्‍हे बकासूर गँगचा म्‍होरक्‍या यश नरेश जांभळे (रा. शाहूपुरी) याच्‍यासह त्‍याच्‍या साथीदारांवर होते. वारंवार या गँगकडून असे गंभीर गुन्‍हे करण्‍यात येत असल्‍यासे सामाजिक स्‍वास्‍थ्य धोक्‍यात आले होते.

यामुळे या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्‍याचा प्रस्‍ताव शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी कोल्‍हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयास सादर केला होता. यास मंजुरी मिळाली असून त्‍यानुसार यश नरेश जांभळेसह १६ जणांवर कारवाई करण्‍यात आली आहे.

कारवाई झालेल्‍यांमध्‍ये यश जांभळे, राहुल संपत बर्गे (रा. दिव्‍यनगरी), टेट्या ऊर्फ गौरव अशोक भिसे, ऋषिकेश ऊर्फ शुभम हणमंत साठे (दोघे रा. गुरुवार पेठ), अनिकेत उदय माने (रा. शनिवार पेठ), आदित्‍य सुधीर जाधव (रा. भैरोबा पायथा, शाहूपुरी), शंतनू राजेंद्र पवार (रा. आरफळ), अनिकेत सुभाष पारशी (रा. शनिवार पेठ), पिन्‍या ऊर्फ सुनील माणिकराव शिरतोडे (रा. सातारारोड) यांच्‍यासह एक अनोळखी तसेच ७ अल्‍पवयीन बालकांचा त्‍यात समावेश आहे.

याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी निवेदनाव्‍दारे दिली आहे. या प्रस्‍तावासाठी सहायक निरीक्षक प्रशांत बधे, अभिजित यादव, कर्मचारी अमित सपकाळ, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्‍वप्‍नील कुंभार, ओंकार यादव, मिथुन मोरे, विजय कांबळे, अमृत वाघ, सतीश बाबर, सुनील भोसले, स्‍वप्‍नील पवार, स्‍वप्‍नील सावंत यांनी परिश्रम घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT