Udayraje Bhosale, Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha News : उदयनराजेंविरोधात शरद पवार देणार खमक्या उमेदवार

Maharashtra Politics : श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार, की उमेदवार बदलला जाणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : सातारा लोकसभेची निवडणूक खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी ताकतीने लढणार आहे. त्यासाठी खमक्या उमेदवार देण्याचा निर्णय झाला आहे. उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार शरद पवार यांना दिले आहेत. त्यामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार, की उमेदवार बदलला जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) खासदार शरद पवार (sharad pawar) गटाची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. सातारा लोकसभेच्या बैठकीवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, डॉ. अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने आदींसह विधानसभानिहाय पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी खासदार शरद पवार आणि जयंत पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. येथील प्रमुख पदाधिकारी यांचे मत जाणून घेतले. या वेळी सर्वांनी सातारा लोकसभेची निवडणूक ताकतीने लढण्याची मागणी केली. उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार शरद पवार यांना देण्यात आले. ते जो उमेदवार देतील त्याचे ताकतीने काम करून निवडून देण्याचा संकल्प केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सातारा बालेकिल्ल्यात शरद पवार यांच्याबाबत सहनुभूतीची लाट निर्माण झाली आहे. याचा फायदा पक्षाला होणार आहे, असेही सांगण्यात आले. पाटणमधील पदाधिकऱ्यांनी सत्यजित पाटणकर, तर रहिमतपूर येथील कार्यकर्त्यांनी सुनील माने यांना संधी देण्याची मागणी केली; पण खासदार शरद पवार पुन्हा श्रीनिवास पाटील यांनाच संधी देणार की उमेदवार बदलणार याची उत्सुकता आता वाढली आहे. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेसाठी उतरविले, तर त्यांच्या विरोधात खमक्या उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.

अजितदादा गटाची भूमिका काय असेल...

राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची जिल्ह्यात ताकत आहे. त्यांच्याकडून सातारा लोकसभेसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराविरोधात ते उमेदवार देणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे एकत्र काम करणार हे ही महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT