Satara Political News : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या वेळी गांधी मैदानावरून महारॅली निघणार असून, या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख सुनील काटकर यांनी दिली आहे.
साताऱ्यातील (Satara) गांधी मैदान येथून मोठे शक्तिप्रदर्शन करत महारॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. या महारॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे लोकसभा समन्वयक अतुल भोसले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची महारॅली सकाळी 11 वाजून 50 मिनिटानी गांधी मैदान येथून सुरू होणार असून, गोलबाग-मोती चौक-देवी चौक-कमानी हौद-शेटे चौक, पोलिस मुख्यालय, गीते बिल्डिंग, शिवतीर्थ पोवई नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या महारॅलीची सांगता होणार आहे. या महारॅलीसाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन उदयनराजेंच्या प्रसिद्धी प्रमुखांकडून करण्यात आलं आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha Constituency) महायुतीची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासून उदयनराजेंनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच आता युतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजे समर्थक जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.