Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी संघटित काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने पाठिंबा दिला आहे. सध्या प्रचाराची धांदल सर्वत्र सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीच्या पोस्टर वरून नव्या वादाला आणि चर्चेला सुरुवात झाली आहे.
शाहू महाराज यांच्या प्रचार पत्रिकेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो नसल्याचे समोर आले आहे. ही बाब महायुतीच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त करत कट्टर शिवसैनिक आता तरी स्वाभिमान दाखवणार का? असा सवाल महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने केला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केल्यानंतर काँग्रेसमधूनही या मतदारसंघावर दावा केला जात होता. अशातच शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचे नाव समोर आल्यानंतर पक्ष निवडण्याचे स्वतंत्र त्यांना महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. शाहू महाराज यांनी काँग्रेस पक्ष निवडत शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्यास नकार दिला होता.
त्यामुळे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाची ही हक्काची जागा काँग्रेसला गेल्याने शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक काही काळ नाराज होते. मात्र, प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापुरात येऊन भेट घेतल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीमागे राहण्याचा ठाम निर्णय घेतला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दहा दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने शाहू महाराज यांना पाठिंबा देण्यासाठी मेळावा घेत आपण त्यांच्या मागे राहणार असून त्यांच्या विजयाचा निर्धार केला. मात्र, आता महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचार पत्रिकेतूनच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याचे समोर आले आहे. ह्या प्रचार पत्रिका कोल्हापूर शहरभरात वाटण्यात आले आहेत.
बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचा फोटोच नसल्याचे महायुतीचे उमेदवार मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणले आहे. समाज माध्यमात त्याबाबत तीव्र भावना व्यक्त होत आहेत. काँग्रेसच्या जाहिरातीवरून बाळासाहेबांचा फोटो गायब! कट्टर शिवसैनिक आता तरी स्वाभिमान दाखवणार का अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना जाब विचारला आहे.
(Edited By DeepaK Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.