Abhijit Bichukale nomination filed  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha : अभिजित बिचुकलेंनी आपली परंपरा कायम ठेवली; नेहमीप्रमाणे पराभव की विजय?

Loksabha Election : सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या आज (शुक्रवार) अखेरचा दिवस होता. तब्बल 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील तसेच अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे.

Umesh Bambare-Patil

Satara Political News : सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे यांच्यात हायव्होल्टेज लढत होत आहे. दोन्ही उमेदवार आपणच विजयी होणार असल्याचा दावा करत आहेत. मात्र, या दोघांच्या विरोधात 'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून रिंगणात उडी घेतली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या आज (शुक्रवार) अखेरचा दिवस होता. तब्बल 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील तसेच अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते अभिजित बिचुकले यांनी. सातारा लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे यांच्यासह २० जण रिंगणार उतरले आहेत.

अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी 2004, 2009, 2014, 2019 मध्ये सातारा लोकसभा लढली. तर 2009 मध्ये सातारकर जनतेने त्यांना पाच आकडी मतदान दिले. बिचुकले यांच्या मागणीनुसारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनाला दिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपण खासदार झाल्यास अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकासाठी पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळे छत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून जनतेने मला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. शक्तिप्रदर्शनाविषयी बिचकुले म्हणाले 'शक्तिप्रदर्शन हे युद्धात दाखवायचे असते. दारू पाजून दाखवायचे नसते.'

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT