Abhijit Bichukale News : बिचुकलेंनी दिले उदयनराजेंना आव्हान; म्हणाले, त्यांनी आत्मपरीक्षण करावे, मी अर्ज भरणारच...!

Abhijit Bichukale To Contest Lok Sabha Elections From Satara : छत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून जनतेने मला मतदान केले पाहिजे बिचुकलेंची भूमिका..
Udayan Raje- Abhijit Bichukale
Udayan Raje- Abhijit BichukaleSarkarnama

Satara Loksabha News : सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात सरळ लढत होत आहे. यामध्ये आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट उदयनराजे भोसले यांना आव्हान देत त्यांना भाजपने तिकीट देताना उदयनराजे यांचा किती मान राखला याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. मी कोणत्याही परिस्थितीत 19 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे.

सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे यांच्यासह 8 जण रिंगणात उतरले आहेत.आता यांच्यासोबत बिग बॉस फेम व कविमनाचे नेते अभिजित बिचुकले यांनीदेखील रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले आहे.

अभिजित बिचुकले यांनी म्हटले की, आतापर्यंत जनतेने उदयनराजे भोसले यांना संधी दिली आता मला संधी द्यावी. मतदारराजा जागृत झाला पाहिजे. कारण त्याच्या हातात सर्व काही आहे, त्यामुळे येत्या 19 एप्रिलला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayan Raje- Abhijit Bichukale
Shahu Maharaj Net Worth : अबब! शाहू महाराज लईच 'श्रीमंत', तब्बल 300 कोटींचे मालक

भाजपकडून (BJP) तिकीट मिळावे ही आमच्या उदयनदादा यांची इच्छा होती. पण भाजपने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज यांचा किती मान राखला याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनाला द्या, ही अतिउच्च मागणी मी केल्यामुळे ते नाव दिले गेले. आता अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकासाठी मी पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे छत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून जनतेने मला मतदान केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

शक्तिप्रदर्शन हे युद्धात दाखवायचे असते, दारू पाजून दाखवायचे नसते. शरद पवार (Sharad Pawar) आणि उदयनराजे यांचे हाडवैर आहे, त्यामुळे मला यावेळेस संधी द्यावी, असे त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वी उदयनराजे यांना संधी दिली आहे, आता मला संधी द्यावी. यापूर्वी उदयनराजे आणि भाऊसाहेब महाराज यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शरद पवार व जयंत पाटील यांनी केला आहे.

आता जनतेने मला निवडून द्यावे. मी वेळ आल्यावर अनेक बाबींवर सविस्तर बोलणार आहे. 19 तारखेला मी अर्ज भरणार असून, मी माझे नाव मनगटाने कमावले आहे, जन्माने अनेकांना नाव मिळते. हे सर्व आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आम्ही केले आहे.

Edited By : Chaitanya Machale

R

Udayan Raje- Abhijit Bichukale
Ajit Pawar News: EVMचे बटन दाबताना हात आखडता घेऊ नका; अन्यथा निधी देताना आम्हालाही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com