Shambhuraj Desai, MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha News : शंभूराज देसाईंच्या निवासस्थानाजवळील उदयनराजेंचे चित्र हटविले... काय आहे कारण...

Udayanraje Bhosale पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाजवळील एका इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे भले मोठे चित्र काढण्यात आले होते. याचित्रावरून बरेच राजकारण रंगले होते.

सरकारनामा ब्युुरो

Satara News : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाजवळील एका इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे भले मोठे चित्र काढण्यात आले होते. याचित्रावरून बरेच राजकारण रंगले होते. आता लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता असल्याने हे चित्र हटविण्यात आले. हे चित्र नेमकं कोणी हटविले हे सांगण्यास कोणीही तयार नाहीत. पण आचारसंहितेचे कारण असल्याची चर्चा साताऱ्यात रंगली आहे.

शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाशेजारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीची इमारत आहे. या इमारतीच्या रस्त्याकडील बाजूस एका कार्यकर्त्याने खासदार उदयनराजे भोसले यांचे पूर्ण आकाराचे त्यांचे पेंटिंग काढले होते. यावरून पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार उदयनराजे यांचे समर्थकांत तु तू मैं मैं झाली हाेती.

त्यानंतरही हे चित्र पूर्ण करण्यात आले होते. त्यामुळे मंत्री देसाई यांचे कार्यकर्तेही नाराज झाले होते. सध्या लोकसभेची निवडणूक लागल्यामुळे आचारसंहितेचे कारण करून हे चित्र हटविण्यात आले. हे चित्र नेमकं कोणी हटवले, याविषयी कोणीही बोलण्यास तयार नाही. याविषयी शंभूराज देसाई यांनीदेखील याविषयाची माहिती नसल्याचे स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काहींनी तर निवडणुकीत पाटणमधून उदयनराजेंना मताधिक्य मिळावे, म्हणून शंभूराज देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हे चित्र हटवल्याची जोरदार चर्चा सातारा व पाटण तालुक्यात रंगली आहे. परंतु आचारसंहितेचे कारण यामागे असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT