Satara Loksabha News : साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांनी त्यांचे नाव न घेता टीका केली होती. या टीकेला शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीसाठी मी कोणाचे आव्हान समजत नाही. माझी तत्वाची लढाई आहे.लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जावे, असे शिंदे म्हणाले.
रडीचा डाव खेळू नये. खोट्या केसेस दाखल करुन राजकारणात कोणाचा आवाज दाबणे याला लोकशाही म्हणत नाहीत. खोट्या केस टाकून दाबण्याचे प्रयत्न केला तरी सत्य मरत नसते. लोकांच्या न्यायालयात जाऊ. सर्व यंत्रणाचा उपयोग करुन राजकीय वापर करण्याचा प्रयत्न करत आहात की काय, अशी शंका येते. असा पलटवार देखील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केला.
महाविकास आघाडीचे 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे सातारा लोकसभेचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच त्यांनी आज (गुरुवारी) कऱ्हाडचा दौरा केला. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर व पदाधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्याला कोणत्याही जातीयवादी पक्षाची दृष्ट लागू नये यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे व्हिजन घेवून पुढे जाणार आहे, असे सांगत आमदार शिंदे यांनी सांगितले.
खासदार उदयनराजे भोसेल udayanraje bhosale यांचे समोर आव्हान आहे. त्या प्रश्नावर आमदार शिंदे म्हणाले, मी कोणाचे आव्हान समजत नाही. माझी लढाई कोणत्या उमेदवाराशी किंवा कोणत्या नावाशी नाही. माझी लढाई तत्वाची आहे. आम्ही आव्हान समजतच नाही. अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्याला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न झाला.
मात्र त्यात यश आले नाही. आत्ताही पक्ष फोडून हा जिल्हा काबीज करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र त्याला लोकांतून प्रतिसाद मिळत नाही. आमच्याकडे सक्षम उमेदवार होते. उमेदवारीसाठी श्रीनिवास पाटील यांना विनंती केली होती. मात्र त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव असमर्थता व्यक्त केली. पक्षाकडून मला लढावे लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे मी उमेदवार म्हणुन लढायला उभा राहिलो आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार भोसले यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदारसंघात फिरणेही शक्य होणार नाही अशी टीका करुन काही प्रकरणे लवकरच पुढे येतील असा इशारा दिला होता. त्यावर शिंदे म्हणाले, मी बारा महिने काम करतो.सातारा जिल्ह्यातील जनसामान्यात माझा संपर्क आहे. जे कोण म्हणत असतील त्यांचा निवडणुकीपुरताच संपर्क आहे का? हे जनता ठरवेल. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जावे. रडीचा डाव खेळू नये. खोट्या केसेस दाखल करुन राजकारणात कोणाचा आवाज दाबणे याला लोकशाही म्हणत नाहीत.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.