Satara Mayor Candidate; udayanraje bhosale, shivendra raje bhosale, sharad pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Election : मुंबईपर्यंत फिल्डिंग लावूनही उमेदवारीवरून डावललं : भाजपच्या बड्या नेत्यासाठी शशिकांत शिंदेंच्या पायघड्या

Satara Mayor Candidate : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेंच झाल्याचे समोर आले आहे.

Aslam Shanedivan

  1. साताऱ्यात महाविकास आघाडीतील उमेदवार निवडीवर रविवारी रात्रीपासून मोठी राजकीय खलबतं सुरू होती.

  2. अमोल मोहिते यांचे नाव जवळपास निश्चित असताना शेवटच्या क्षणी चर्चा बदलली आणि सुवर्णा पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

  3. सुवर्णा पाटील यांनी भाजप मुलाखतीनंतर तातडीने मुंबई गाठल्याने या बदलाला अधिक नाट्यमय वळण मिळाले.

Satara News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभेद असणारी महायुती तुटली असून महाविकास आघाडीतही अलबेल असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजप शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवाय येथे मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील झाल्याचे दिसून येत आहे. अशातच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाच नुकताच भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत आलेल्या उमेदवाराच्या नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडण्या लावाव्या लागल्याचे समोर आले आहे. यामुळे येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमक काय सुरूय असा प्रश्नच विचारला जात आहे.

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार तयारी करत कंबर कसली. भाजपने पूर्ण तयारी करत उमेदवार फिक्स केले. पण त्याच वेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दोनच दिवसांपूर्वी(17 नोव्हेंबर) प्रवेश केला.

त्यांनी प्रवेश करताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लगेचच सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना जाहीर केली. त्यामुळे पालिकेत भाजपच्या दोन्ही राजेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापुढे आव्हान निर्माण केले होते.

पण सोमवारी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असतानाच महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे समोर आले. यामुळे राष्ट्रवादीसह ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस समोर पेच निर्माण झाला होता. पण रविवारी रात्रीपासून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करून तोडीस तोड उमेदवार देण्याबाबत डावपेच आखले होते.

सुवर्णा पाटील यांनी आधी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी सोमवारी सातारा येथे नगराध्यक्षपदासाठी मुलाखत दिली आणि तातडीने थेट मुंबई गाठली. त्या मुंबईत तळ ठोकून होत्या, अशी चर्चाही साताऱ्यात होती. पण रविवारी दुपारी नगराध्यक्षपदासाठी अमोल मोहिते यांचे नाव जवळपास निश्चित झाले.

यानंतरच सुवर्णा पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यावर शशिकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासोबत चर्चा करून सुवर्णा नरेंद्र पाटील यांना उमेदवारी निश्चित केली.

यावेळी काँग्रेसचे बाबासाहेब कदम, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. दत्तात्रय धनवाडे, शिवसेनेचे नरेंद्र पाटील उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार म्हणून सुवर्णा पाटील यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

FAQs :

1. सुवर्णा पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी कशी मिळाली?

शशिकांत शिंदे यांनी MVA नेत्यांशी चर्चा करून शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी निश्चित केली.

2. अमोल मोहिते यांचे नाव बदलण्यामागील कारण काय?

अंतर्गत चर्चा आणि पक्षसंतुलन राखण्यासाठी उमेदवारी बदल झाल्याचे सांगितले जाते.

3. सुवर्णा पाटील यांनी भाजपची मुलाखत का दिली होती?

त्यांनी नगराध्यक्षपदासाठी भाजपकडूनही संधी मागितली होती.

4. निर्णय प्रक्रियेत कोणते नेते सहभागी होते?

शशिकांत शिंदे, नितीन बानुगडे पाटील आणि रणजितसिंह देशमुख यांनी चर्चा केली.

5. या बदलाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?

MVA च्या संघटनात्मक एकजुटीचा संदेश जात असल्याने लढत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT