Satara ZP Election : 'पाल'ला आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; खुल्या आरक्षणानं दिग्गजांची तंतरली

Karad Politics : पाल जिल्हा परिषद गटात खुल्या आरक्षणामुळे आजी-माजी आमदारांमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगली आहे. भाजपच्या शिरकाव्याने चुरस वाढली असून, महायुती-आघाडीमध्ये रस्सीखेच तीव्र झाली आहे.पाल गटात प्रतिष्ठेची थरारक लढत दिग्गज आमदार आमने-सामने!
Local-Body-Elections
Local-Body-ElectionsSarkarnama
Published on
Updated on

संतोष चव्हाण

Karad North ZP Election : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या पाल गटात चुरशी लढत मानली जाते. आजी-माजी आमदारांचे या गटाकडे विशेष लक्ष असून, उत्तरेतील सर्व निवडणुकांत पालच्या खंडोबाचा आदर्श घेऊनच प्रचाराचा नारळ फुटतो. त्यामुळे या गटाला विशेष महत्त्व आहे. त्यात यावेळी जिल्हा परिषदेसाठी हा गट यावेळी खुला झाल्याने गटात दिग्गजांमध्येच लढाई पाहायला मिळणार आहे. गटात दुरंगी लढत होणार असली, तरी आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार, हे नक्की.

पाल जिल्हा परिषद गटावर गेल्या अनेक वर्षांपासून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे समर्थक, पाल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवराज पाटील यांची पकड आहे. काही अपवाद वगळता देवराज पाटील यांनी वर्चस्व कायम राखले आहे. जिल्हा परिषदेत त्यांनी शिक्षण सभापती, तसेच पंचायत समितीचे सभापती पदही भूषविले आहे. पाल गटात माजी मंत्री पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे त्यांनी पूर्णत्वास नेली आहेत. त्यामुळे गटात त्यांचा दबदबा कायम आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने या मतदार संघावर विशेष लक्ष दिले आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून येथे भाजपने निधीची कमतरता पडू दिली नाही. आमदार घोरपडे यांचे विश्वासू सुरेश पाटील यांनी पाल गट भाजपमय करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाल ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविल्याने कार्यकर्त्यांतही उत्साहाचे वातावरण आहे.

गटात महाविकास आघाडी व महायुती अशी दुरंगी लढत होईल, असे चित्र दिसून येते. महायुतीकडून सुरेश पाटील, मदन काळभोर व बाळासाहेब साळुंखे ही नावे चर्चेत आहेत. महाविकास आघाडीतून देवराज पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. गटांतर्गत पाल व चरेगाव हे गण येतात. चरेगाव गणात आमदार मनोज घोरपडे यांना मानणारा भाजपचा गट असून, सद्यःस्थितीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.

Local-Body-Elections
karad Nagar Parishad News : महायुतीवर चर्चा होईल, पण नगराध्यक्ष आमचाच! भाजप आमदाराने चर्चेपूर्वीच विषय क्लिअर केला!

पाल गणात मतदारांत चर्चेतून अनेक पैलवान तेल लावून आखाड्यात उतरण्याचा तयारीला लागले आहेत. यामुळे महायुतीत नाराजी नाट्य होणार असल्याचे चित्र आहे. माजी मंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाल व चरेगाव गणात उमेदवारी देताना सर्वसमावेशक चेहरा देणार असल्याची चर्चा आहे.

गणात शिवसेनेचा दावा:

पाल गटात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला पाल गणाची उमेदवारी मिळावी, आपल्याला विचारात घेऊन उमेदवारी निश्चित करावी, अशी भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना उमेदवारी देण्यावरून रस्सीखेच होणार असल्याचे दिसून येते.

Local-Body-Elections
Karad Politic's : प्रतिष्ठा पणाला लागणार पृथ्वीराजबाबा-अतुल भोसलेंची; पण उदयसिंह उंडाळकर, मनोहर शिंदे ठरणार किंगमेकर

नाराजी पडणार महागात:

पाल जिल्हा परिषद गटात बाबासाहेब साळुंखे- चोरेकर घराण्याची भूमिका महत्त्वाची आहे. उमेदवारीवरून चोरेकर कुटुंबाला नाराज करणे महागात पडू शकते, अशी या गटात चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारीवरून त्यांची नाराजी झाल्यास ती कोणाच्या पथ्यावर पडणार? याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com