Udayanraje Bhosale News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : केंद्रीय मंत्र्यासमोर टीका झाल्यानंतर चोवीस तासांतच उदयनराजेंनी उडवली कॉलर; म्हणाले,"मी नाही तुम्ही आहात डॉन..."

Satara News : वैयक्तिक आयुष्यात उदयनराजे काहीही करू शकतात...

Mangesh Mahale

Pune : दहीहंडी कार्यक्रमात उदयनराजे भोसले स्टेजवर मुलींसोबत नाचतात, कॉलर उडवतात, हे भाजप पक्षाचा नियमावलीत बसते का, असा थेट प्रश्न राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. मिश्रा यांनी "वैयक्तिक आयुष्यात उदयनराजे काहीही करू शकतात," असं उत्तर दिलं. त्याला चोवीस तास उलटताच खासदार उदयनराजेंनी 'बाप्पा'च्या विसर्जन मिरवणुकीत पुन्हा कॉलर उडवून कार्यकर्त्यांसोबत डान्स केला. डीजेवर 'मैं हु डॉन.." हे गाणे सुरू होते. त्यावर थिरकणाऱ्या समर्थकांना राजे म्हणाले,"मी नाही तुम्ही सगळे डॉन आहात," त्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

काल पत्रकाराने राजेंच्या उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना "उदयराजे कॉलर उडवतात हे भाजपच्या नियमावलीत बसते का? असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना मिश्रांची चांगलीच दमछाक झाली. या प्रश्नाची चर्चा आता दिल्ली दरबारी सुरू झाली असून, पक्षश्रेष्ठी यावर काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजयकुमार मिश्रा हे साताऱ्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मिश्रांना उदयनराजेंविषयी साताऱ्यातील पत्रकाराने हा प्रश्न विचारून अडचणीत टाकले. विचारलेल्या प्रश्नानंतर उदयनराजे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. राजकीय परिणामांची भीती न बाळगता उदयनराजेंनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला आहे. त्यांच्या कॉलर उडवण्याच्या मुद्दा मिश्रांसमोर उपस्थित झाला होता. त्याला चोवीस तास उलटत नाही, तोच राजेंनी विसर्जन मिरवणुकीत कॉलर उडवली.

"वैयक्तिक आयुष्यात उदयनराजे काहीही करू शकतात," असं उत्तर मिश्रा यांनी दिलं. हा प्रश्न विचारला गेला होता ते उदयनराजे मात्र शांत बसले होते. मात्र, त्यांच्या देहबोलीवरून त्यांना राग आल्याचे स्पष्ट दिसत होते.

उदयनराजेंची कॉलर उडविण्याची स्टाइल जगजाहीर आहे. जाहीर कार्यक्रमांत आणि भर सभेत कॉलर उडवून विरोधकांना आव्हान देणारे उदयनराजे आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी उदयनराजे ही स्टाइल करतात. त्यांचा प्रत्यय पुन्हा विसर्जन मिरवणुकीत आला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT