Mahesh Shinde Shashikant Shinde
Mahesh Shinde Shashikant Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : शशिकांत शिंदे अॅक्शन मोडवर, आमदार महेश शिंदेना जशास तसे उत्तर देणार!

सरकारनामा ब्यूरो

सातारा : कोरेगावच्या विद्यमान आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी दिला होती. यावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आज कोरेगावात पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाले, यापुढे जर अशा प्रकारची भाषा लोकप्रतिनिधी वापरत असेल, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. यामुळे आता येथील स्थानिक राजकारण पेटलेले दिसून येत आहे.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघात लोक सत्य पुढे आणून ते सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्तेच्या मस्तीत असलेले लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यांना लोकांनी काम करण्याची संधी दिली म्हणून, आम्ही कुठल्याही प्रकारे विरोध केला नाही. परंतु त्या असलेल्या संधीचा उपयोग जनहितासाठी करण्यापेक्षा त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने कार्यकर्ता, विरोधक अशा अनेकांना आपल्या अधिकारातून धमकावण्याचा, संपवण्याचा प्रयत्न केला.

विविध माध्यमातून आमच्यावर आरोप केले, खरं म्हटलं तर त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून साहजिकच माझ्या सहकाऱ्यांनी आरोप केलेले आहेत. ते आरोप केल्यामुळे चिडून जाऊन रात्री विद्यमान आमदारांनी सोशल मीडिया अध्यक्षांना खालच्या स्तरावर जात धमकी आणि कुटुंबीयांना मारण्याचा इशारा  दिला. हे कुठेतरी झाकण्यासाठी व्हाट्सअप द्वारे कॉल करून हा सगळा प्रताप त्यांनी केला.

ज्यांनी त्यांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला अशा सगळ्यांना त्यांनी धमकी आणि इशारा देण्याचा प्रयत्न केला. आजवर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो ; परंतु रमेश उबाळे, प्रताप बोधे, निलेश कदम, सागर बर्गे, सूरज देवकर, साहिल शेख, वैभव पवार आणि अशा अनेक सर्व सामान्य कार्यकर्त्यांना, तरुण सहकाऱ्यांना अशाप्रकारे धमकी देणे चुकीचे आहे. लोकशाहीने प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला आहे. तो अधिकार त्यानी पूर्णपणे वापरावा. लोकांना पटलं तर लोक स्वीकारतील. परंतु यापुढे जरा अशा प्रकारची भाषा लोकप्रतिनिधी वापरत असेल, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.

याबाबत राष्ट्रवादीच्या आमच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी पोलीस चौकशीसाठी तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी चौकशी करून या बाबतीत संबंधितांना समज द्यावी व कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जर पोलिसांनी लक्ष घातले नाही आणि या सत्तेच्या मस्तीला आळा घातला नाही तर जशास तसे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT