Jaykumar Gore Extortion Case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : अश्लील फोटो प्रकरणी मंत्री गोरेंकडे खंडणी मागणारी महिला अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यात; काँग्रेस कार्यकर्त्याशी संपर्क केला अन्...

Jaykumar Gore Extortion Case : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेने अश्लील फोटो पाठवल्याचे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागितली होती. या प्रकरणी सातारा पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.

Jagdish Patil

Satara News, 21 Mar : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी शुक्रवारी (ता.21) सकाळी अटक केली. खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी ही कारवाई केली. अश्लील फोटो पाठवल्याचे प्रकरण मिटवण्यासाठी या महिलेने गोरे यांच्याकडे 3 कोटींची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तर मागितलेल्या खंडणीपैकी एक कोटी रुपये स्वीकारताना या महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व सातारा (Satara) शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणावरून विरोधकांनी मंत्री गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर संबंधित महिलेने गोरे यांच्यावर आरोप करत राज भवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र, या प्रकरणात 2019 मध्ये मंत्री गोरे यांची न्यायालयाने मुक्तता केली आहे. तरीही याप्रकरणी आंदोलन करणार असल्याचे संबंधित महिलेच्या नावाचे पत्र पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी व संबंधित महिलेचाही पत्त्यावर पाठवण्यात आले होते.

त्यावरून हे प्रकरण पुन्हा तापलं होतं. यावरून विधानसभेत गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. रम्यान, हे प्रकरण सुरू असतानाच पत्रकार तुषार खरात यांना वडूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी व जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. खरात यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिवाय खरात यांच्यावरही दहिवडी पोलिस ठाण्यात मंत्री गोरे यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. खरात प्रकरण सुरू असतानाच शुक्रवारी (ता.21) सकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने व शहर पोलिसांनी साताऱ्यात संयुक्त कारवाई करत अश्लील फोटो पाठवण्याचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेला खंडणी घेतल्या प्रकरणी अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी महिलेला का अटक केली याबाबतची माहिती सांगितली. ते म्हणाले, अश्लील फोटोचे प्रकरण मिटवण्यासाठी संबंधित महिलेने वाई येथील काँग्रेसचे कार्यकर्ते विराज शिंदे यांच्याकडे तीन कोटी रुपये जयकुमार गोरे यांनी द्यावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्यात बोलणी होऊन सुरुवातीला एक कोटी रुपये द्यायचे ठरले.

हे एक कोटी रुपये घेण्यासाठी संबंधित महिलेने शिंदे यांना तिच्या वकिलांच्या सातारा येथील कार्यालयात बोलावले होते. याबाबतची माहिती शिंदे व मंत्री गोरे यांच्याकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अरुण देवकर व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि महिलेला एक कोटी रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT