Shashikant Shinde and Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politics : शिंदे-देसाईंची गळाभेट अन् बंद दाराआड चर्चा, भेटीनंतर शिंदे म्हणाले, "मला ऑफर..."

Satara News Shashikant Shinde and Shambhuraj Desai Meeting : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील गळाभेटीची आणि बंद दाराआड चर्चेची चर्चा सध्या सुरु आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News, 10 Sep : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. युती आघाड्यांमुळे सध्या कोणता नेता कोणाला भेटतोय यावर सर्वांची बारीक नजर आहे. सध्या अशाच एका भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लढवलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde ) आणि शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील गळाभेटीची आणि बंद दाराआड चर्चेची चर्चा सध्या सुरु आहे.

विविध बैठकांच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्याचवेळी पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) नियोजित बैठकांसाठी कार्यालयात आले होते. दोघेही समोरासमोर येताच एकमेकांची गळाभेट घेतली. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात एकत्र बसून कॉफी घेतली. त्यानंतर बंद दाराआड चर्चाही केली.

कोरेगाव मतदारसंघातील विविध प्रश्नां संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांची काही कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई हे नियोजित बैठकीसाठी तेथे आले. यावेळी शिंदेकडे पाहून मंत्री देसाई त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही गळाभेट घेतली आणि चला कॉफी घेऊ असे मंत्री देसाई म्हणाले.

त्यावर दोघेही जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले. तेथे दोघांनीही बंद दाराआड कॉफी घेतली व अर्धातास चर्चा ही केली. या भेटीची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. या भेटीबाबत शंभूराज देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, "चला कॉफी घेऊ म्हणून आम्ही एकत्र बसलो. नेहमीप्रमाणे कॉफी येण्यास उशीर झाला, त्यामुळे उशीर झाला कमरा बंद काहीही नव्हते.

प्रत्येकवेळी राजकारणाचा विचार करुन नका, मैत्रीपण असते. असे म्हणून त्यांनी शेजारीच बसलेल्या आमदार मकरंद पाटील यांच्याकडे पाहत वर्षभरापूर्वी मकरंद आबाही महायूतीत आले. त्याआधी ते आमच्यासोबत नव्हते. त्यांच्याशी आमची मैत्रीच आहे," असं स्पष्टीकरण दिलं.

तर शशिकांत शिंदेंनी सांगितलं, जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्या बैठका होत्या. त्याचवेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आले, त्यांना भेटून आमच्या कामाचे विषय त्यांना सांगितले. आम्ही दोघांनीही एकमेकांना ऑफर दिलेली नाही. मला ऑफर देऊन काहीही फायदा नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT