Satara SP Tushar Doshi, who is at the center of the Zilla Parishad election controversy, has reportedly gone on medical leave Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Controversy : साताऱ्याचे SP तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, जिल्हा परिषद राडा प्रकरण भोवलं, सभापती निवडीपूर्वीच कारवाई!

Satara SP Tushar Doshi Shivsena : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. पोलिसांकडून मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणी एसपी दोशी यांच्यावर कारवाईवाची मागणी करण्यात येत होती.

Roshan More

Satara News : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेली मोठा राडा झाला होता. पोलिसांकडून मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. देसाई यांनी या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवला होता.

शिवसेनेचे मंत्री, आमदारांकडून जोशी यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. चार एप्रिलला जिल्हा परिषदेच्या विविध समितींच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यापूर्वीच ही करावाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत दोशी यांना सक्तीवर रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी असणार आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकी भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पाच सदस्यांना फोडले होते. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे यांना पोलिसांनी मतदान करू न देता अटक केली होती.

तसेच या वेळी पोलिसांना अडवणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. भाजपच्या फायद्यासाठी पोलिसांनी हे काम केल्याचा आरोप देसाई यांनी करत पोलिस भाजपचे घरगडी असल्यासारखे वागले, अशी टीका देसाई यांनी केली होती. तसेच ‘तो एसपी घरगड्यासारखा वागलाय, त्याला तत्काळ निलंबित करा, सेवेतून त्याला बडतर्फ करा', अशी मागणी विधानसभेत केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT