Satara ZP controversy : पत्नी झेडपी अध्यक्ष होताच महेश शिदेंचा कॉन्फिडन्स वाढला, थेट मंत्री शंभुराज देसाईंना घेतलं अंगावर

MLA Mahesh Shinde vs Shambhuraj Desai : विधान परिषदेत पोलिसांच्या अरेरावीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री शंभूराज देसाई यांनी थेट पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह इतर शंभर पोलिसांचं निलंबन करावं अशी मागणी देसाई यांनी केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एसपी तुषार दोशी यांच्यासह इतर १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले.
Mahesh Shinde, Shambhuraj Desai
Mahesh Shinde speaks on Satara ZP controversy, defending police amid political clash over leadership election.Sarkarnama
Published on
Updated on

Satara News, 23 Mar : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर भाजपचे राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. मात्र, या निवडणुकी दरम्यान मोठा राडा झाला होता.

या राड्यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली होती. या सर्व प्रकरणाचे पडसाद आज राज्याच्या विधान परिषदेत उमटले. विधान परिषदेत पोलिसांच्या अरेरावीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री शंभूराज देसाई यांनी थेट पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह इतर शंभर पोलिसांचं निलंबन करावं अशी मागणी देसाई यांनी केली.

त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एसपी तुषार दोशी यांच्यासह इतर १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करणं पोलिसांना भोवल्याचं दिसत आहे. मात्र, आता अशातच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांचे पती महेश शिंदे यांनी पोलिसांची बाजू घेत थेट शंभूराज देसाईंना सुनावलं आहे.

Mahesh Shinde, Shambhuraj Desai
Satara ZP Controversy : सातारा जिल्हा परिषदेतील हस्तक्षेप अंगलट; एसपी तुषार दोशींसह 100 पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

या सर्व प्रकरणावर बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले, पोलिसांना विनाकारण यामध्ये घुसवणं चुकीचं आहे. अजूनही सर्वांनी अभ्यास केला पाहिजे आणि फक्त दोन सदस्य माझे आहेत. पालकमंत्र्यांनी एवढा दंगा करायची काय गरज आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तर अजितदादांचे पाच सदस्य फुटले त्याचं बघाना, असं म्हणत महेश शिंदे यांनी या सर्व प्रकरणाची माहिती मी एकनाथ शिंदेना दिली होती आणि असं होणार हे त्यांना सांगितल्याचा दावा केला आहे. शिवाय सदस्यांना शरद पवारांच्या गटासोबत जाणं पटलेलं नाही, असा दावाही महेश शिंदेंनी केला.

Mahesh Shinde, Shambhuraj Desai
Satara ZP controversy : अरे तुरे करतच शंभूराज आणि मकरंद आबांकडून SP तुषार दोशींचे जाहीर वाभाडे, जिल्हा परिषदेतील राड्याचे राज्यात पडसाद

त्यामुळे एकीकडे शंभूराज देसाई पोलिसांविरोधात आणि भाजपविरोधात आक्रमपणे खिंड लढवत असतानाच त्यांच्याच पक्षाचे आमदार पोलिसांचं समर्थन करताना दिसत आहेत. त्यामुळे आता पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com