Satara Voting News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Voting News : जनतेचे प्रश्न सोडवणारा खासदार लोकसभेत पाठवा; श्रीनिवास पाटील यांचे सहकुटुंब मतदान!

Chetan Zadpe

Satara Voting News : आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 11 मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातही आज मतदान पार पडत आहे. साताऱ्याचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यानी माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधला . (Lok Sabha Election 2024)

श्रीनिवास पाटील यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले , "लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा माणूस दिल्लीला पाठवावा," असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज कराड (जिल्हा सातारा) येथे केले.

खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी कराड शहरातील पालिका शाळा नंबर तीनमध्ये आज मंगळवारी सहकुटुंब मतदान केले. राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील, त्यांच्या पत्नी रचनादेवी पाटील, नातू उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये संविधानाने 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. संपूर्ण देशाची जडणघडण या मतदानाच्या माध्यमातून होते. प्रत्येकाने येऊन मतदानाचा (Voting) हक्क बजावावा. आपल्या भविष्यामध्ये आपली सहानुभूती आणि प्रेरणा बाळगून दिल्लीमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा," असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT