Satara News : राज्यात महानगरपालिका निवडणुकांनंतर आता 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निकालाकडे जाहीर झाला आहे. 12 जिल्हा परिषदांसाठीच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी (ता.7 फेब्रुवारी) मतदान झालं होतं. दोन्ही निवडणुकांसाठी तब्बल 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मंत्री व भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सातारा जिल्ह्यातील कुसुंबी जिल्हा परिषद गटात जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. मंत्री व भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांच्या निकटवर्तीयांना जिल्हा परिषदेच्या या गटातून पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांच्यामुळेच शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, एकनाथ शिंदे आणि शशिकांत शिंदे यांनी भाजपविरोधात एकत्र येत सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कविता ओंबळे यांना शिवसेनेची उमेदवारी दिली होती.
या निवडणुकीत कुसुंबी गटातून अर्चना ज्ञानदेव रांजणे यांना ओंबळे यांनी पराभवाची धूळ चारली. या पराभवानं शशिकांत शिंदेंनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या पराभवाची परतफेड केल्याचं बोललं जात आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दोन धक्के बसले आहेत. जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटात पराभव झाला असून तिथं या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देसाई यांनी बाजू खेचून आणली आहे. तर दुसरीकडे औंध गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव केला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांची मतमोजणी सुरु आहे. सातारा जिल्ह्यात 67.80 टक्के मतदान झालं होतं. त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कौल कुणाला यासाठी जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी मतदान हक्क बजावल्याचं समोर आलं होतं. पण या निवडणुकीत धक्कादायक निकालांची नोंद झाल्याचं दिसून येत आहे.
या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे भाजप आंधळी गटातून विजयी झाल्या आहेत.त्या विक्रमी 18 हजार मताधिक्य मिळवलं आहे. मात्र, त्यांच्याच उमेदवारीला मंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र विरोध केल्याची चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.