Gokul director Vishwas Patil with son Sachin Patil during Zilla Parishad election campaign, which ended in defeat after shifting allegiance from Congress leader Satej Patil to Shiv Sena.
Gokul director Vishwas Patil with son Sachin Patil during Zilla Parishad election campaign, which ended in defeat after shifting allegiance from Congress leader Satej Patil to Shiv Sena.sarkarnama

Kolhapur ZP : जिल्हा परिषदेसाठी सतेज पाटलांची साथ सोडली अन् घात झाला; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाचा पराभव

Kolhapur ZP Election Result : सतेज पाटील यांची साथ सोडून शिवसेनेत गेलेल्या विश्वास पाटील यांना मोठा धक्का बसला असून, जिल्हा परिषद निवडणुकीत पुत्र सचिन पाटील यांचा पराभव झाला आहे.
Published on

Kolhapur politics News : जिल्हा परिषदेचे स्वप्न पाहून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची साथ सोडून शिवसेनेत गेलेल्या गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. शिरोलीचे सरपंच आणि चिरंजीव सचिन पाटील यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. राष्ट्रवादीकडून राजू सूर्यवंशी यांनी विजयी बाजी मारत शिवसेनेच्या सचिन पाटील यांचा पराभव केला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या निवडणुकींपैकी ही एक निवडणूक होती.

गोकुळच्या निवडणुकीत महाडिक गटाची साथ सोडून विश्वास पाटील यांनी काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सतेज पाटील यांनी विश्वास पाटील यांना २ वर्ष गोकुळच्या दूध संघावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विश्वास पाटील यांनी सतेज पाटील यांची साथ देत काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची जबाबदारी विश्वास पाटील यांच्यावर सोपवण्याचा निर्णय सतेज पाटील यांनी घेतला होता. मात्र विश्वास पाटील यांनी नकार दर्शवला. चिरंजीव सचिन पाटील यांचे जिल्हा परिषदेचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सतेज पाटील यांची साथ सोडून ऐनवेळी विश्वास पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Gokul director Vishwas Patil with son Sachin Patil during Zilla Parishad election campaign, which ended in defeat after shifting allegiance from Congress leader Satej Patil to Shiv Sena.
Kolhapur ZP Result : कोल्हापूरात मिळाली 'हाता'ला साथ; काँग्रेसची दमदार सुरुवात;पहिला निकाल बाजुने! जनसुराज्यला धक्का

जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून त्यांनी पाडळी खुर्द या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू सूर्यवंशी आणि भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने के. एन. पाटील यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी सचिन पाटील यांना उमेदवारी निश्चित करण्याचे ठरविले होते.

Gokul director Vishwas Patil with son Sachin Patil during Zilla Parishad election campaign, which ended in defeat after shifting allegiance from Congress leader Satej Patil to Shiv Sena.
Satej Patil : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील मोठी बातमी सतेज पाटलांनी फोडली, भाजपचा प्लॅन केला उघड

मात्र निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेल्याने काँग्रेसची उमेदवारी के. एन. पाटील यांना मिळाली. निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी राजू सूर्यवंशी यांनी 11 हजार 416 मते घेऊन 545 मतांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या स्थानावर सचिन पाटील राहिले. तर काँग्रेसच्या के. एन पाटील यांना 6816 इतकी मते मिळाली. मात्र ऐनवेळी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचा फटका विश्वास पाटील यांना बसल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com