Satara News: सातारा परिषद विषय समिती सदस्यांच्या उद्या निवडी होणार आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भारतीय जनlता पक्षाने बहुमत नसतानाही सत्तेच्या जोरावर बाजी मारली होती. त्यावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर झालेल्या सभापतिपदाच्या निवडणुकीवर या दोन्ही पक्षाने बहिष्कार टाकला होता, त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापतिपदावर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते, त्यामुळे उद्या होणाऱ्या विषय समिती सदस्यांच्या निवडीत शिवसेना-राष्ट्रवादी सहभागी होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी, अर्थ, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी, जलव्यवस्थापन व स्वच्छता, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, महिला व बालकल्याण, समाज कल्याण या विषय समिती सदस्यपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. एकूण 83 जागांवर कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बहुमत नसतानाही भाजपने प्रशासनाच्या मदतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळविले, त्यावेळी झालेला राडा संपूर्ण राज्यात गाजला होता. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने धक्काबुक्की झालेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हा प्रश्न दोन्ही सभागृहात मांडला होता, त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये साताऱ्यात मोठे अंतर पडले आहे.
सभापतिपदाच्या निवडणुकीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्याा दुरुपयोगाचा निषेध करत बहिष्कार टाकला होता,त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे चारही सभापती बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे विषय समिती सदस्य पदाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या विरोधात शिवसेनाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोर्टात दाद मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येकी एक,तर भाजपकडे 27 पाठबळ आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच जिल्हा परिषद सदस्य भाजपने फोडले होते.
आता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे असणारे सदस्य आणि भाजपच सदस्य हे जवळपास समसमान होत आहेत,त्यामुळे विषय समिती सदस्याच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होऊ शकते. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत सहभागी होणार की बहिष्कार टाकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.