कागल (जि. कोल्हापूर) : विधान परिषदेचा उमेदवार म्हणून सर्व नगरसेवकांनी माझ्या पारड्यात मतदान करून विकासाला गती देण्यासाठी बळ द्यावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी करत त्यांनी कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्थेची विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा केली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील निवडून आले आहेत, असे जाहीर करतो, कारण त्यांच्याविरोधात प्रबळ उमेदवारच नाही. पण, भाजपला उमेदवार उभा करावा लागेल, असे सूचक वक्तव्येही त्यांनी केले. (Satej Patil announced his candidature for the Legislative Council elections)
मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून नगरपालिकेने केलेल्या वातानुकूलित कत्तलखाना, नाना-नानी ऑक्सीजन पार्कचे उदघाटन आणि शाहू वसाहत वड्डवाडी येथील चौथ्या टप्प्यातील ९० घरकुलांचा लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी मंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, रमेश माळी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, गरीब, सर्वसामान्यांना न्याय देऊ शकणाऱ्या कामांवर मंत्री मुश्रीफ यांनी लक्ष केंद्रित केले. त्यातूनच गरिबांचा आशीर्वाद व ज्येष्ठांची पुण्याई मिळणारी कामे त्यांनी केली आहेत. विकासाचा पॅटर्न म्हणून कागलकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास आम्ही शोधतोय त्यांना मंत्री मुश्रीफ यांनी केलेली विकास कामे दाखविण्याची गरज आहे. येणाऱ्या निवडणुकीत याची पोहोचपावती देण्यासाठी अपप्रवृत्तीला बाजूला करा, असे आवाहन त्यांनी केले. विकासकामे दर्जेदार केलेबद्दल प्रवीण काळबर व संजय ठाणेकर यांचा सत्कार झाला.
नगरसेवक सतीश घाडगे यांनी स्वागत केले. प्रवीण काळबर यांनी प्रास्ताविक केले. नितीन दिंडे यांनी आभार मानले. उपनगराध्यक्ष विवेक लोटे, अध्यक्ष शामराव पाटील, आनंदा पसारे, नूतन गाडेकर, मुख्याधिकारी पंडीत पाटील आदी उपस्थित होते.
९० घरकुलांचे वितरण
मंत्री मुश्रीफ म्हणाले, उत्कृष्ट व दर्जेदार पद्धतीने विकासकामे झाली आहेत. शहरात गरीब आणि सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी १००२ घरकुले बांधण्यात येत आहेत. यातील चौथ्या टप्यातील ९० घरकुलांचे वितरण आज करत आहोत. दिवाळी हक्काच्या घरात आनंदाने साजरी करा. राज्याची ११ कोटी लोकसंख्या असून ५ कोटी कामगार आहेत. यातील केवळ ८० लाख कामगार संघटित असून ४ कोटी २० लाख असंघटित आहेत. या असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.