MLA Satej Patil addressing the media while expressing displeasure over the State Election Commission’s Zilla Parishad and Panchayat Samiti election schedule. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil: निवडणूक आयोग, राज्य सरकारचा अनागोंदी कारभार! नागरिकांसह उमेदवारांना होतोय मनस्ताप; सतेज पाटलांनी केली 'ही' मोठी मागणी

Zilla Parishad Elections : राज्य निवडणूक आयोगाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमावर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त करत, कमी प्रचार कालावधी व प्रशासनिक अनागोंदीवर तीव्र टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News : राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमावर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारांना प्रचारासाठी केवळ नऊ दिवस मिळणार आहेत. जिल्हापरिषदेचे मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या मोठे असल्याने उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचणार कसे? असा सवाल करत निवडणुकीच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं निवडणूक आयोग, राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांसह उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्य निवडणुक आयोगानं मंगळवारी (ता.13) जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, या कार्यक्रमावर आमदार सतेज पाटील यांनी नापंसती व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेचे मतदारसंघ भौगोलिकदृष्टया मोठे आहेत. मात्र प्रचाराला केवळ नऊ दिवस मिळणार असल्याने उमेदवार मतदारापर्यत पोहोचू शकणार नाहीत.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमावलीचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त करून निवडणुकीत प्रक्रियेत सुसूत्रता आणावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत स्थानिक स्तरावर सूचनाही देण्यात आल्या आहेत. आघाडी म्हणून शक्य नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती होतील असंही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणुक आयोग, राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळं नागरिकांसह उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीकाही आमदार पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT