Kolhapur Election 2026: ...तर तिसऱ्या आघाडीचा डाव फसणार, मविआचाही 'करेक्ट कार्यक्रम'? कोल्हापूरच्या राजकारणात 'ही' असणार आव्हानं?

Rajarshi Shahu Aaghadi And MVA : प्रत्येक पक्षाच्या कार्यालयातून निवडणुकीची रणनीती ठरवली जात आहे. घराणेशाहीतून पुढे आलेल्या उमेदवारांविरुद्ध आघाडीतील उमेदवारांचा कस लागणार, हे निश्चित आहे. तिन्ही पक्षांनी एकदिलाने प्रचार यंत्रणा राबवली, तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: महाविकास आघाडी, महायुती यांच्यासोबत तिसरी आघाडी म्हणून राजर्षी शाहू आघाडी महापालिकेच्या निवडणूक रिंगणात आहे. आम आदमी पक्ष (आप), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन दोन मातब्बर आघाडीशी झुंज देत आहे. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय असले, तरी मतांची बेरीज जमविण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. तिन्ही पक्षांनी एकदिलाने प्रचार यंत्रणा राबवली, तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो.

इंडिया आघाडीचे घटक म्हणून वावरणाऱ्या या पक्षांनी वेगळी चूल मांडल्याने महापालिकेच्या सत्ता वर्तुळात या नव्या आघाडीच्या रणनीतीला महत्त्व आले आहे. मात्र, त्याचबरोबर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi)देखील काही ठिकाणी अडचणीत येणार आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात लढताना घाईला आलेली महाविकास आघाडीला तिसऱ्या आघाडीमुळे पुन्हा अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

जिल्ह्यात तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनुभवी नेते असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर कार्यकर्ते झोकून देऊन काम करणारे आहेत. या पक्षाचा गट मजबूत असून, इंडिया आघाडीतून घेतलेल्या फारकतीमुळे निवडणुकीत नवी समीकरणे मांडावी लागणार आहेत. 'आप'ने गेल्या सहा वर्षांत स्वतःचे अस्तित्व दाखविले आहे. मूलभूत नागरी प्रश्नांवर सातत्याने आंदोलनाचे हत्यार उपसून महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.

वंचितला आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा आधार आहे. तिन्ही पक्षांची काही ना काही बलस्थाने असली तरी, आघाडीतील उमेदवारांच्या विजयासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे लागणार आहे. कॉंग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, भाजपच्या उमेदवारांचे तगडे आव्हान आघाडीसमोर आहे. त्यातून उमेदवारांना निवडून आणण्याचे कौशल्य नेत्यांना पणाला लावावे लागेल. निवडणूक जाहीर होताच सुमारे अकराशे इच्छुकांची फौज निवडणुकीत होती.

Kolhapur Municipal Corporation
AIMIM News: काळे झेंडे, धक्काबुक्की, इम्तियाज जलील यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला; ती गल्ली-मोहल्ला ओवैसींनी पिंजून काढला

माघारीच्या दिवशी मात्र केवळ 325

रिंगणात शड्डू ठोकून लढाईला तयार झाले. मतदारांच्या अर्थपूर्ण अपेक्षा लक्षात घेऊन ही निवडणूक झेपणार नाही, या भावनेने अनेकांनी माघारीचा मार्ग अवलंबला. काही उमेदवारांची बंडखोरी थोपविण्यात त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाला यश आले. त्या तुलनेत आपने मैदानात लढण्याचा पवित्रा कायम ठेवला, हे विशेष. मतांची जुळणी करताना प्रभागातील काही कार्यकर्त्यांचा 'अर्थ'पूर्ण वाटाघाटीकडे कल असेल, याची जाणीव असूनही, त्याला विशेष महत्त्व दिलेले नाही.

राष्ट्रवादीचे 23, आपचे 14 व वंचितचे 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे आपने प्रभाग क्रमांक वीसमधून तृतीयपंथीस उमेदवारी दिली आहे. पत्रकांवर खासदार शाहू महाराजांचे छायाचित्र राजर्षी शाहू आघाडीतील उमेदवारांच्या पत्रकांवर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे छायाचित्र छापले आहे.

Kolhapur Municipal Corporation
Pankaja Munde : "ताई... ओ ताई...!" कार्यकर्त्याची एक हाक अन् पंकजा मुंडेंनी जे केलं, त्याने जिंकली लाखो मने! 'व्हिडिओ' होतोय तुफान व्हायरल!

शाहू महाराज इंडिया आघाडीचे घटक असले तरी शाहू आघाडीने त्यांचे छायाचित्र छापण्यास प्राधान्य दिले आहे. कोल्हापूरचे छत्रपती म्हणून असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आघाडीने घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे आघाडीच्या या भूमिकेची चर्चा होऊ लागली आहे.

प्रत्येक पक्षाच्या कार्यालयातून निवडणुकीची रणनीती ठरवली जात आहे. घराणेशाहीतून पुढे आलेल्या उमेदवारांविरुद्ध आघाडीतील उमेदवारांचा कस लागणार, हे निश्चित आहे. आघाडीतील प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या झेंड्याखाली उतरला असता तरी नेत्यांसह उमेदवारांची दमछाक होणे स्वाभाविक होते. एकमेकांच्या हातात हात घालून आघाडीतील उमेदवारांच्या रिक्षा प्रभागांत फिरत आहेत.

Kolhapur Municipal Corporation
Pankaja Munde : सकाळी सासऱ्यांचा अंत्यविधी, दुपारी अश्रूंना रोखत थेट नाशिकच्या सभेत ! पंकजा मुंडेंची पक्षनिष्ठा पाहून गिरीश महाजन भारावले

झाडू, तुतारी, गॅस सिलिंडरचा प्रचार दमदार सुरू असल्याने आघाडीचे किती उमदेवार किती मतांचे मनसबदार ठरतील, याकडे विरोधकांचे लक्ष आहे. बावीस ते पंचवीस हजार मतदारांच्या प्रभागात कोण किती मते घेईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. थोड्याफार मतांच्या फरकाने उमेदवार विजयी होतील, असे बोलले जात असले तरी, तिसऱ्या आघाडीने विरोधकांचे टेन्शन वाढवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com