Satej Patil and Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : "मुश्रीफ हतबल, महायुतीत असूनही कोर्टात का जावं लागलं...." सतेज पाटलांनी थेट मुद्द्यावर बोट ठेवलं

Satej Patil on Hasan Mushrif : "गेल्या सहा महिन्यांपासून गोकुळ दूध संघाची जी हानी झाले ते भरून काढण्यासाठी महायुतीला बाजूला काढल्याशिवाय पर्याय नाही. काही गोष्टी वादात गेल्या आहेत. त्याला महायुती जबाबदार असल्याचं ठराव धारकांच मत आहे. एका तालुक्यातील भांडणामुळे पंधराशे लोकांना त्रास झाला. कालपर्यंत आम्हाला न्यायालयात जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची वेळ आली."

Jagdish Patil

Kolhapur News, 17 Sep : अदृश्य शक्ती कोण? याचे उत्तर महायुतीमधील नेत्यांनी द्यावे. अदृश्य शक्तीची इतकी भीती त्यांच्यामध्ये आहे की, ते नाव घेऊ शकत नाहीत. जर महायुतीतील नेते त्यांना या गोष्टीचा त्रास झाला असं म्हणत असतील तर त्यांनी त्यांचा नाम उल्लेख करावा.

अदृश्य शक्तीची इतकी धास्ती आहे, तर ती सत्तेत आली तर यांची काय अवस्था होईल हे दूध उत्पादक बघतायेत, महायुतीमधून लढण्यासाठी हसन मुश्रीफ आता हतबल आहेत. अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी आव्हान दिले, ते आज कोल्हापुरात बोलत होते.

आज राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांना गोकुळ मध्यवर्ती कार्यालयात जाऊन अभिवादन केलं. आघाडीचे 25 पैकी आज 18 उमेदवार निश्चित झाले असून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. दूध उत्पादकांना एकमुखी नेतृत्व हवे आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून गोकुळ दूध संघाची जी हानी झाले ते भरून काढण्यासाठी महायुतीला बाजूला काढल्याशिवाय पर्याय नाही. काही गोष्टी वादात गेल्या आहेत. त्याला महायुती जबाबदार असल्याचं ठराव धारकांच मत आहे. एका तालुक्यातील भांडणामुळे पंधराशे लोकांना त्रास झाला. कालपर्यंत आम्हाला न्यायालयात जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची वेळ आली. मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी ही लढाई सुरू होती. मल्टीस्टेट थांबवण्यासाठी ही लढाई होती, असे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

मंत्री मुश्रीफ यांनी आमच्या खांद्यावर बसून कोर्टात गेले असे म्हणण्यापेक्षा महायुतीत असून तुम्हाला कोर्टात का जावे लागले. तुम्ही सत्तेत आहात, मंत्री आहात, मग या संस्थांना त्रास का झाला? तुमची ताकद कमी पडते का?

एकाने तक्रार करायची आणि दुसऱ्याने निरासन करायची हा गोकुळ मध्ये लावलेला तमाशा होता का? जिल्ह्यातील सुज्ञ दूध उत्पादकांना माहिती आहे ही लढाई सुरू कोणी केली? अशा शब्दात आमदार पाटील यांनी हल्लाबोल केला. तर सरकार तुमचे होते मग प्रशासन आलेच का? दुग्ध निबंधकांकडे सुनावण्या झाल्या का? दूध संस्थांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली होती, हे चौदाशे संस्थांना कळलेले आहे. असा पलटवार आमदार पाटील यांनी केला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर खर्च त्यांच्या बाजूने होत आहे. आमच्या बाजूने होत नाही. पैसे आमच्याकडे नाहीत आमचं सामान्य आणि गरीबाचे पॅनल आहे. महायुती दिग्गज आहेत आमचं पॅनेल शेतकऱ्याचा आहे. पैशाची थैली त्यांच्याकडून आणली जात आहे. कारण लिलाव त्यांच्याकडून होत आहेत. गोकुळचे हित कोणाकडे आहे हे दूध उत्पादक शेतकऱ्यांना माहिती आहे. आत्ताच एकमेकांची डोके फोडत आहेत मग नंतर त्यांची अवस्था काय होईल, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT