UP Political news : भाजपला मोठा झटका, सहावेळा मंत्री राहिलेल्या ओबीसी नेत्याने ठोकला रामराम

Ram Asare Kushwaha, Ramashray Kushwaha joins SP, Kushwaha leaves BJP, Samajwadi Party UP : ओबीसी मतदारांवर पकड असलेल्या कुशवाहांच्या घरवापसीमुळे आगामी यूपी निवडणुकीत भाजप विरुद्ध सपाची थेट लढत अधिक चुरशीची; जातीय राजकारणात नवे गणित तयार.
Ramashray Kushwaha joins SP
Ramashray Kushwaha joins SPSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh update : उत्तर प्रदेशमध्ये पुढीलवर्षी विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी सत्ताधारी भाजपसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने कंबर कसली आहे. उमेदवारीसाठी आतापासून इच्छूकांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. अशातच भाजपला राज्यात मोठा धक्का बसला आहे. राज्यातील मातब्बर ओबीसी नेते राम आसरे कुशवाहा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

राम आरसे कुशवाहा यांनी गुरूवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपसह बहुजन समाज पक्ष, आरएलडी आणि निषाद पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. कुशवाहा यांनी सहावेळी मंत्री म्हणून काम केले आहे. राज्यातील बड्या ओबीसी नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.

कुशवाहा यांची ही घरवापसी आहे. आधी ते सपामध्येच होते. राष्ट्रीय महासचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सुमारे १३ वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजकारणातील त्यांची सुरूवात बहुजन समाज पक्षातून झाली होती. १९९६ मध्ये त्यांनी पहिली विधानसभेची निवडणूक लढविली आणि विजयी झाले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केलो होता.

Ramashray Kushwaha joins SP
NIA court verdict : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारासह 29 जण गेले; देश हादरविणाऱ्या प्रकरणाचा लागला निकाल...

मागील अनेक वर्षांपासून ते राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. मागासवर्ग घटकांभोवतीच त्यांचे राजकारण फिरत पाहिले आहे. मुलायम सिंह यादव यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. आता कुशवाहा यांनी पुन्हा सपामध्ये प्रवेश केल्याने पक्षाला ताकद मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे.

Ramashray Kushwaha joins SP
BJP MP case : लोकसभेत काँग्रेसच्या ज्या नेत्याने केला पराभव, भाजप उमेदवाराचे त्यांच्याच लेकीशी लग्न; आता पत्नी खासदार, पण झाला घटस्फोट

दरम्यान, उत्तर प्रदेशातील राजकारण नेहमीच ओबीसी आणि अन्य जातीय समीकरणांशी जोडले गेले आहे. समाजवादी पक्षासह भाजपनेही या घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप सरकारने या घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या निवडणुकीत भाजप विरूध्द समाजवादी पक्ष अशी थेट लढत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com