Congress Leader Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil News: 'स्थानिक' निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटलांंनी दाखवली मोठी चूक; आयोगाकडे केली महत्त्वाची मागणी

Congress Politics: राज्यात होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. अशातच कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी सर्वच राजकीय पक्षांनी प्रारूप मतदारयादीवर हरकत नोंदवण्याचा पवित्रा घेतल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी राज्य सरकारसह राज्य निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पध्दतीने फोडलेल्या नाहीत. बऱ्याच मतदारांची नावे राहत असलेल्या प्रभागांतून इतर प्रभागांमध्ये गेली आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत 15 दिवसांनी वाढवा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व विधिमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारूप मतदारयाद्या (Voter List) प्रभागनिहाय योग्य पध्दतीने फोडलेल्या नाहीत, बऱ्याच मतदारांची नावे राहत असलेल्या प्रभागांतून इतर प्रभागांमध्ये गेलेली आहे असं या पत्रात म्हटलं आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हरकती घेण्याची पध्दतदेखील अत्यंत किचकट असून प्रत्येक व्यक्तीने विहीत नमुन्यात अर्ज करावयाचा असून सोबत आधार कार्ड जोडायचे आहे. ही पध्दत किचकट व वेळकाढू आहे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

जर कोणत्याही व्यक्तीने अथवा राजकीय पक्षाने निवडणुकीच्या सक्षम अधिकाऱ्याच्या योग्य ती हरकत व सूचना निदर्शनास आणून दिल्यास अनेक व्यक्तींबद्दलची तक्रार स्वीकारली पाहिजे, मात्र,तसे होत नाही. मतदार याद्यांबाबत स्पष्टता व पारदर्शकता येण्यासाठी राजकीय पक्षांच्या व प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे.

प्रभागातील नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या मतदार याद्या तपासण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून ती 15 दिवसांनी वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT