Gauri Garje News : 'आमच्या मुलीचा खून झालाय, त्याला आत्महत्या म्हणू नका!'; गौरी गर्जेच्या आई-वडिलांचा खळबळजनक दावा

Gauri Garje parents claim : अनंत गर्जेचे आधीच किरण नावाच्या मुलीशी लग्न झालेले होते, ही गोष्ट त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवली. ते माहित असते तर आम्ही आमच्या पोटचा गोळा त्याला दिला असता का? असा सवाल गौरीच्या आईने उपस्थितीत केला.
PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
PA Anant Garje Gauri Death Pankaja mundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Newes : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या अनंत गर्जे याची पत्नी डाॅ. गौरी गर्जे-पालवे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेनंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असताना गौरी गर्जे हिच्या आई-वडिलांनी शिरूर कासार तालुक्यातील आपल्या पिंपळनेर गावात माध्यमांशी बोलताना अनेक खुलासे केले. आमच्या मुलीचा खून झालाय, त्याला आत्महत्या म्हणू नका, असे आवाहन करत त्यांनी टाहो फोडला.

गौरी ही धाडसी मुलगी होती, आमची फसवणूक करून अनंत गर्जे याच्या बहिणीने आणि ढाकणे नावाच्या एक मध्यस्थाने ही सोयरिक जुळवली होती. सुरुवातीचे दोन-तीन महिनेच अनंत चांगला वागला. त्यानंतर मात्र सतत तो माझ्या मुलीशी भांडायचा, तिला मारहाण करायचा. अनंत गर्जेचे आधीच किरण नावाच्या मुलीशी लग्न झालेले होते, ही गोष्ट त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवली. ते माहित असते तर आम्ही आमच्या पोटचा गोळा त्याला दिला असता का? असा सवाल गौरीच्या आईने उपस्थितीत केला.

आरोपीच्या वकिलांनी माझ्या मुलीवर चुकीचे आरोप करू नयेत, माझ्या मुलीला अनंत त्याचा भाऊ आणि शितल गर्जे यांनीच मारहाण केली. माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तुमच्या मुलीने आत्महत्या केली, तिच्या मढ्याजवळ मी बसलेलो आहे, असा फोन अनंत गर्जेने आधी गौरीच्या वडिलांना आणि नंतर मला केला होता, असा दावा यावेळी करण्यात आला. माझी माध्यमांनाही विनंती आहे, की त्यांनी गौरीने आत्महत्या केली असे म्हणू नये, हा खून आहे.

सत्तर किलोच्या माझ्या मुलीचे प्रेत एकटा अनंत गर्जे घेऊन जाऊच शकत नाही. तिला मारहाण करून खून केला तेव्हा तिथे तिघेजण होते. अनंत, त्याचा भाऊ अजय आणि बहीण शीतल. दरवाजा लावलेला होता, तर मग अनंत तिसाव्या मजल्यावर घरात शिरला कसा? पोलिसांनी आम्ही येण्याआधी बाॅडी पोस्टमार्टमला कशी नेली? सायंकाळी सहा वाजेपासून तर दुसऱ्या दिवशीच्या रात्री बारापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला पाहिजे, अशी मागणीही गौरीच्या आईने केली.

PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
Congress Vs MNS: काँग्रेसनं कितीही उलट्या उड्या मारल्या, तरी राज ठाकरेंशिवाय मविआला मुंबईत 'नो ऑप्शन'; मनसे फिरवू शकते गेम

नार्को, ब्रेन मॅपिंग, एसआयटी चौकशी करा..

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे पाहून आम्ही गौरीचा विवाह अनंत गर्जेसोबत लावून दिला होता. पण त्याने वर्षभराच्या आतच माझ्या मुलीला मारले. आम्हाला न्याय हवा आहे, आरोपींची नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा, एसआयटी चौकशी करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी गौरीचे वडील अशोक पालवे यांनी माध्यमांशी बोलताना केली. अनंत गर्जेला अटक झाली असली तरी त्याचा भाऊ आणि बहीण अजून मोकाट आहेत, त्यांना अटक का होत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली.

मी 30 वर्षांपासून मेडिकल क्षेत्रात आहे. कोणता बाप लग्न झालेल्या मुलाला मुलगी देईल.चुकीचा गैरसमज पसरवू नका. मी एसपी यांना अर्ज लिहिला आहे, त्यात तपासाची माहिती देण्याची मागणी केली आहे. बंद असलेल्या खोलीत माझी मुलगी कशी गेली? तिच्या शरीरावर वार होते, तिला मारहाण झाली. माझी मुलगी मारली, तिने आत्महत्या केली नाही.नातेवाईक आल्यानंतर पंचनामा केला जातो. मात्र तसं झालं नाही, नुसता मुलगा बघून किंवा श्रीमंत आहे म्हणून मुलगी देऊ नका, असे आवाहनही पालवे यांनी यावेळी केले.

PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
Ajit Pawar NCP: पुणे जिल्ह्यातला राष्ट्रवादीचा दबदबा संपला? अजितदादांची फोडाफोड–तडजोडींवरच मैदान मारण्याची तयारी

पंकजा मुंडेंनी घेतली भेट...

दरम्यान, आज मंत्री पंकजा मुंडे यांनी पिंपळनेरमध्ये जाऊन गौरीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. आपल्या गौरी आणि अनंत गर्जे यांच्यातील वादाची अजिबात कल्पना नव्हती. किती सुंदर जोडा होता, कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात आपण जास्त डोकावत नाही, ते योग्यही नसते. या प्रकरणाची सखोल चौकशी आणि योग्य तपास व्हावा, अशा सूचना आपण पोलिसांना दिल्या आहेत. तपासासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल, कुठल्याही परिस्थितीत आरोपींना शिक्षा होईल आणि गौरीला न्याय मिळेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी

PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
BJP Vs Thackeray Brothers : मोदींच्या मंत्र्यानं ठाकरे बंधूंना मुंबईत येऊन ललकारलं; निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद पेटवला; म्हणाले....

दोषींची गय केली जाणार नाही-चाकणकर

कुटुंबाला दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही पिंपळनेर येथे गौरी गर्जे-पालवे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्नन केले. या प्रकरणाचा योग्य तपास होईल. दोषींची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी कुटुंबियांना दिली. गौरीसारख्या प्रतिभावान डॉक्टर तरुणीची आत्महत्या अत्यंत दुर्देवी आहे. राज्य महिला आयोग त्यांच्या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आयोगातर्फे तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आवश्यक ते सहकार्य केले जाईल. गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू, असे चाकणकर म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com