Satej Patil News : मागील पाच ते दहा वर्षाच्या काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, सहकारी संस्थांच्या सत्तेच्या केंद्रभागी असलेले काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आगामी राजकारणात एकटे पडले आहेत. राज्यातील बदललेली सत्ता समीकरणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली मात पाहता आगामी सर्वच निवडणुकींना काँग्रेसचे नेतृत्व म्हणून आमदार सतेज पाटील यांना एकट्यालाच सामोरे जावे लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सतेज पाटील यांना देखील त्याची जाणीव झाली असून त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध संस्था प्रतिनिधींची बैठक पार पडली. त्यावेळी गडहिंग्लज येथे आवाहन केले आहे.
'कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मी गेले 20 ते 25 वर्षे कार्यरत आहे. राजकारणात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. कोणत्या तरी ‘पंचवार्षिक’ला सगळे माझ्यासमवेत असतात. एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतो. आता एकटा आहे. तुम्ही सारे सोबत आहात ना,’ अशी भावनिक साद आमदार सतेज पाटील यांनी घातली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. . महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सर्व मिळून सामोरे जाऊया. गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक जनता दलासह सर्वजण मिळून लढूया. माणूस तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा तो चांगले वागतो, चांगले बोलतो. कदाचित यश वेळाने मिळेल, पण चांगल्या माणसाला यश मिळतेच, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद या निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांसोबत महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढणार आहोत. याबाबतचा निर्णय झाला आहे. महाविकास आघाडीचे जितके उमेदवार निवडून आणण्याचा पण प्रयत्न करू तितकी विजयाच्या जवळजवळ असा विश्वास ही सतेज पाटील यांनी चंदगड मध्ये व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.