Satej Patil On Akshay Shinde Encounter Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Akshay Shinde Encounter : आपटे, कोतवालांना वाचवण्यासाठी हा 'एन्काऊंटर' होता का? सतेज पाटलांना शंका

Rashmi Mane, Rahul Gadkar

Akshay Shinde Encounter Issue : बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती. मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळं बोलत आहेत हे संयुक्तिक नाही. आपटे ना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर होता का? याची शंका निर्माण होत आहे.

सरकारने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. त्यांनी देखील आक्षेप घेतला आहे. आरोपीला चौकशीसाठी का आणण्यात आलं होतं? अशा अनेक प्रश्न आज आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहेत. बदलापूर येथील आरोपीच्या मृत्यूनंतर ते आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.

450 पानाच चार्जशीट फाईल झालं होतं, मग पुन्हा तपासासाठी का आणण्यात आली? तपासाला आणायची वेळ संध्याकाळची का निवडण्यात आली होती? अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला हा चुकीचा आहे.

याहून वाईट म्हणजे गृह खातं सक्षम म्हणून देशभरात ओळखलं जातं. अशावेळी आरोपी गाडीमध्ये बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न करतो. फायर करतो हे गृहखात्याची नामुष्की असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

आरोपीला सांभाळू शकत नाही. योग्यरीत्या खबरदारी घेऊ शकत नाही. ही गृह खात्याची नामुष्की आहे. आरोपीला शिक्षा व्हायला हवी हे आमची सर्वांची एकमत आहे. यामध्ये कोणतेही दुमत असायचा गरज नाही.

पण एन्काऊंटर झालं की लगेच काही वेळात डिजिटल बॅनर लागतात. वेगळ्या पद्धतीचा वातावरण होते. यावरून संशयाचा वातावरण निर्माण झालं आहे. या सर्वांवरून गृह खात्याची इमेज कशी होत आहे हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेण्याची गरज असल्याचे सतेज पाटील (Satej Patil) यांनी म्हटले आहे.

चौकशी हा विषय नाही. हा विषय वेगळीकडे जात आहे. नेमकी घटना काय घडल्या हे समोर येणे गरजेचे आहे. एस्कॉर्ट करणारी टीम किती जणांची होती. हे समोर येणं गरजेचं आहे. त्या टीम मधल्या लोकांनी समोर येऊन काय घटना घडली सांगायला हव.

तरच गृह खात्यावरील विश्वास कायम राहील. सत्ताधारी पक्ष आमच्याबद्दल काहीही बोलत आहे. मात्र विरोधी पक्ष म्हणून आम्ही आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या भूमिकेचे आहोत. यामध्ये गृहखात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. आपटे अद्याप का सापडले नाहीत? त्यांना शोधण्याचा गृहखात का प्रयत्न करत नाही. त्याचेही डिजिटल बोर्ड लावावेत आणि क्रेडिट घ्यावे. असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.

बदलापूरच्या घटनेनंतर (Badlapur Case) महाराष्ट्राला मान शरमेने खाली घालावी लागली. या घटनेचा समर्थन पाठराखण कोणीही करत नाही. मुख्यमंत्र्यांनी आपटे ना अटक का झाली नाही याचे उत्तर द्यावं, असा आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे.

फडणवीस यांनी बदलापूर घटना, अंतरवाली सराटी घटना झाल्यावरच राजीनामा देणे अपेक्षित होते. त्यांच्याकडून अनेक कृत्य घडलेले आहेत. मात्र ते राजीनामा देत नाहीत. डीजीपी ने पत्रकार परिषद घेऊन काय घटना घडली हे सांगणं गरजेचं आहे. प्रोटोकॉल पाळले होते का? हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे तर संभ्रमावस्था कमी होईल. असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT