Satej Paatil On Bawankule .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil On Bawankule: बावनकुळे हेलिकॉप्टरमधून सातबारे फेकायचेच राहिलेत; काँग्रेसच्या सतेज पाटलांनी महायुतीची वाजवली

Congress Vs Mahayuti : कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी आम्हीच चिन्हावर उभे आहोत. महायुतीमध्येच आता सावळा गोंधळ आहे हे समोर आलं आहे. कोण म्हणतं, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, मालक आम्ही आहोत .पण हे सरकार हे विसरलं की, तिजोरीचे मालक महाराष्ट्राची जनता आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: राज्याचे महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हुपरीमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी आलेले असताना कर्जमाफीसह सातबारा, भूमापन, प्रॉपर्टी कार्ड या विषयावर भाष्य केले. तोच धागा पकडून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी महायुतीची चिरफाड केली आहे.

सत्ताधारी नेत्यांची इतकी आश्वासनाची खैरात झाली आहे की मंत्री बावनकुळे आणि केवळ हेलिकॉप्टरमधून या ७/१२ उतारे फेकायचे बाकी राहिले आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.

काँग्रेस नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत जोरदारपणे निवडणुका लढवत आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. निकाल काहीही लागला, तरी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचेल. काँग्रेसचं (Congress) चिन्ह नाही असं म्हणणं म्हणजे विरोधकांचा अभ्यास कमी आहे असंही काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी म्हटलं.

कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी आम्हीच चिन्हावर उभे आहोत. महायुतीमध्येच आता सावळा गोंधळ आहे हे समोर आलं आहे. कोण म्हणतं तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, मालक आम्ही आहोत .पण हे सरकार विसरलं की तिजोरीचे मालक महाराष्ट्राची जनता आहे.

निवडणूक आयोगाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? असा सवाल सतेज पाटील यांनी करत एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे. असं म्हणत असेल तर निवडणूक आयोगाने सो मोटो कारवाई केली पाहिजे. मतदार यादीतील घोळ किती मोठया प्रमाणात केला आहे. ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगात सांगतो. त्याच ठिकाणी आम्ही मतदारयादी नीट करू शकत नाही, यांसारखी शोकांतिका नाही, असा हल्लाबोलही सतेज पाटील यांनी केला.

राजकीय पक्षांनी हे काम करायचं म्हटलं तर निवडणूक आयोग कशाचे पैसे घेते.थोडा वेळ लागला, निवडणुका पुढे गेल्या तरी चालेल पण हे दुरुस्त करून घ्यावे.सत्ताधारी पक्ष देखील याबाबत बोलत असतील तर याची दखल घेतली पाहिजे.मतदार याद्या बनवण्याचे काम कोणत्या कंपनीला दिलं होतं.त्या कंपनीचं नाव सरकारने जाहीर करावे. असेही पाटील म्हणाले.

अधिवेशन घेण्याची आर्थिक ताकद देखील या सरकारकडे नाही. आधी रस्त्यावरचे खड्डे भरा, मग प्रॉपर्टी कार्ड आणि दुबईसारखं स्वप्न दाखवा. स्थानिक नेतृत्वात ताकद नाही, त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील नेते प्रचारासाठी येत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रचार सभा घेत आहेत. अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती आहे. लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. लोकांनी याबाबत महायुतीला जाब विचारला पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT