Jay Pawar Yugendra Pawar: युगेंद्र पवारांचं मुंबईत, तर अजितदादांच्या चिरंजीवाचं 'या' देशात होणार लग्न? बारामतीत 'लगीनघाई'

Jay Pawar And Yugendra Pawar Wedding : एकीकडे राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहणारी बारामती सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आली आहे. बारामतीच्या पवार कुटुंबातही एकाचवेळी दोन दोन लगीनघाई सुरू आहे
Pawar Family wedding.jpg
Pawar Family wedding.jpgSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुती, विरोधकांच्या महाविकास आघाडीसह सर्वच छोट्या मोठ्या राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहणारी बारामती (Baramati) सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आली आहे.

राज्यात राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींच्या शाही विवाह सोहळ्यांचा जोरदार धडाका सुरू आहे. यात तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा मुलगा मल्हार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व शिवसेनेचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र पुष्कराज यांच्यासह यांसह नुकत्याच पार पडलेल्या विवाह सोहळ्यांसह अनेक नेतेमंडळींच्या कुटुंबात लग्नाचा बार उडणार आहे.

बारामतीच्या पवार कुटुंबातही एकाचवेळी दोन दोन लगीनघाई सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Jay Pawar) यांचे चिरंजीव जय पवार 5 डिसेंबरला तर दादांचे मोठे बंधू श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार येत्या 30 नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकणार आहे. या दोन बहुचर्चित लग्न सोहळ्यांसाठी बारामतीतील पवार कुटुंब ऐन निवडणुकांच्या तापलेल्या राजकीय वातावरणात पुन्हा एकत्र येणार आहे.

त्यात युगेंद्र पवारांचा लग्नसोहळा मुंबईत होणार आहे. तर अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा विवाहसोहळा हा परदेशात पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. बहरीन हे सौदी अरेबियाच्या पूर्वेला वसलेलं शहर आहे.याच बहरीनमध्ये जय पवारांचा शानदार विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा आहे. राज्यात नगरपालिका आणि आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या धामधूमीत पवार कुटुंबात सुरू असलेली जोरदार लगीनघाई चर्चेचा विषय ठरत आहे.

Pawar Family wedding.jpg
Maharashtra Politics Live Update : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळामुळे अंतिम यादीसाठी आयोगाकडून मुदतवाढ!

विधानसभा निवडणुकीतील यशानंतर अजितदादांनी स्थानिकच्या निवडणुका जिंकण्यासाठीही पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यांनी निवडणुकांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून राज्य पिंजून काढलं आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांसाठी आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात अजितदादांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतलेले जय पवार स्थानिकच्या निवडणुकांवेळी मात्र लग्नाच्या तयारीत गुंतल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत थेट काका अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरलेले युगेंद्र पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार आटोपता घेतल्याची चर्चा आहे. लग्नाची तारीख जवळ आल्यानं त्यांनी प्रचारातून काढता पाय घेतल्याचं बोललं जात आहे. मुंबईत आणि बाहेरच्या देशात होत असलेल्या जय आणि युगेंद्र पवार यांच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा आत्तापासूनच सोशल मीडियात रंगू लागली आहे.

Pawar Family wedding.jpg
Municipal Elections : कोकणात महायुतीने राष्ट्रवादीच्या तोंडाला पाने पुसली? दोन जागा सोडणाऱ्या शिवसेना-भाजपला नेत्याने घेरत दिला कडक इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा आज साखरपुडा पार पडत आहे. ऋतुजा पाटील यांच्यासोबत जय पवार यांचे लग्न ठरलं आहे. साखरपुडा ठरल्यानंतर जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील साताऱ्यातील फलटण येथील प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत.

शरद पवार यांचे नातू आणि अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा 3 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला होता. या कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सर्वजण सहकुटुंब उपस्थित होते. तनिष्का कुलकर्णी ह्या मूळच्या मुंबईतील आहेत. त्यांचे वडील प्रसिध्द व्यावसायिक असून प्रभादेवी येथे ते राहतात. तनिष्का यांनी लंडनमधील कास बिझनेस स्कुलमध्ये त्यांनी फायनान्स क्षेत्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com