Satej Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil News : 'पत्ते पिसून डाव टाकलाय, डावातला हुकमी एक्का आमच्याकडे', सतेज पाटलांनी सांगून टाकली रणनीती

Kolhapur News : महाविकास आघाडीच्या रणनीतीवरून बोलताना सतेज पाटील यांनी आत्मविश्वास दाखवत डावातील हुकमी एक्का आमच्याकडे म्हणजेच महाविकास आघाडीकडे (MVA) आहे, असे विधान केले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Satej Patil News : राज्यातील महाविकास आणि महायुतीतील गुंता अधिकाधिक वाढत चालला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जागावाटपाचा तिढा दोघांमध्ये कायम आहे. त्यावर महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय असणार, याबाबत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील Satej Patil यांनी सूचक विधान करत भूमिका मांडली. महाविकास आघाडीच्या रणनीतीवरून बोलताना सतेज पाटील यांनी आत्मविश्वास दाखवत डावातील हुकमी एक्का आमच्याकडे म्हणजेच महाविकास आघाडीकडे (MVA) आहे, असे विधान केले आहे.

जागावाटपाबाबत रोजच मॅरेथॉन बैठकी होत आहेत. मात्र, महाविकास आघाडीबद्दल अजूनही सुस्पष्टता नाही. त्यावरून सतेज पाटील यांना विचारलेल्या प्रश्नावर, महाविकास आघाडीचे पत्ते व्यवस्थित पडतील. डाव आखलेला आहे. पत्ते पिसलेले आहेत. डावातला हुकमी एक्का महाविकास आघाडीकडे राहणार असल्याचे सूचक विधान सतेज पाटील यांनी केले. 'महायुतीमध्ये (Mahayuti sarakar) गडबड आहे, पण हळूहळू बाहेर पडेल. महाविकास आघाडीमध्ये जे काही ठरलं ते वरिष्ठ नेते माध्यमांसमोर सांगतील, असे सतेज पाटलांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधी हाणामारीच्या घटना घडलेल्या नाहीत. सत्ताधारी आमदारांमध्ये हाणामारीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. विधिमंडळातील महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही उपलब्ध नाही हे वाईट आहे. सिक्युरिटीच्या दृष्टीने असा प्रकार विधिमंडळात घडत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट नाही. उद्या चुकीची घटना घडली तर त्याचे सीसीटीव्ही मिळणार का? असा सवाल सतेज पाटील यांनी केला.

भाजपचा (BJP) इतिहास सर्वांना माहीत आहे. माहीत असूनही तुम्ही चुकीचा निर्णय घेतला यात चूक कुणाची? आता पश्चाताप करण्यात काय अर्थ नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीला यापूर्वी शिवसेनेला अनुभव आला होता. आता निर्णय घेतला तर त्याला सामोरे गेलेच पाहिजे, असा सल्ला आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना दिला आहे.

लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत आहेत. कारवाई होत नसल्यानेच त्यांचे धाडस वाढले आहे. संरक्षण असल्याचा समज हा लोकशाहीला घातक आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि बिघडलेली आहे. आता ते जनतेसमोर येत आहेत.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT