Ajit Pawar News : "...तोपर्यंत मी गप्प बसणार नाही," अजितदादांचं शरद पवार, मुख्यमंत्री अन् फडणवीसांसमोर विधान

Ajit Pawar In Baramati : अजित पवार भाषणाला उभे राहिले, तेव्हा 'एकच वादा, अजित दादा' अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.
ajit pawar
ajit pawarsarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना ग्वाही देतो, एक दिवस असा येईल की बारामती महाराष्ट्रातील नंबर एकचा तालुका असेल. तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. काम केलं, तर एक नंबरचं करतो. नाहीतर भानगडीत पडत नाही, असंही अजित पवारांनी ( Ajit Pawar ) रोखठोक सांगितलं.

ajit pawar
Gautam Gambhir News : जय हिंद! गौतम गंभीर यांचा राजकारणाला 'रामराम'; मोदी, शाह अन् नड्डांना म्हणाले...

बारामतीत आज ( 2 मार्च )'नमो महारोजगार' मेळावा पार पडत आहे. तसेच, बारामती बस स्थानक, बऱ्हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय आणि बारामती शहरातील अपर पोलिस अधीक्षक कार्यालय, शहर पोलिस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पण, सर्वांच्या नजरा शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे लागून होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार भाषणाला उभे राहिले, तेव्हा 'एकच वादा, अजितदादा' अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. अजित पवार म्हणाले, "राज्यात, देशात, विदेशात मोठ्या प्रमाणात रोजगार आहेत. फक्त संधीचं सोनं केलं पाहिजे."

ajit pawar
Lok Sabha Election 2024 : अक्षय, युवराज अन् कंगणा भाजपकडून निवडणूक लढणार? 'या' मतदारसंघातून मैदानात उतरू शकतात

"बारामती पोलिस हाउसिंगची दुरवस्था झाली होती. पोलिस कसं राहायचे, याचा मला कमीपणा वाटत होता. पूर्वी 73 पोलिस क्वाॅर्टर्स होत्या. पण, 7 मजली इमारती बांधून 196 क्वाॅर्टर्स केले आहेत. यासाठी 75 कोटींचा निधी खर्च करण्यात आला. बारामती बस स्थानकाची जागा कमी होती. मात्र, महाराष्ट्रात एक नंबरचं बस स्थानक आपण निर्माण केलं आहे. करायचं तर नंबर एकच करायचं.. नाहीतर भानगडीत पडायचं नाही," असं अजित पवारांनी सांगितलं.

ajit pawar
Sambhaji Bhide News : मनमाडमध्ये भिडेंची गाडी अडवत काळे झेंडे दाखवले; भाजप आमदारानं फडणवीसांकडे केली 'ही' मागणी

"माझी फुशारकी नाही, पण प्रत्येक इमारतीचा पाया घेतल्यापासून पूर्णत्वाला जाईपर्यंत एका इमारतीला 40 वेळा भेट दिली, हे मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे. पोलिसांना गस्त घालण्यासाठी, कायदा सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी साधने लागतात. त्यासाठी पोलिसांना 39 वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुणाचीही गुंडगिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही," असं अजित पवारांनी म्हटलं.

ajit pawar
Baramati Namo Rojgar Melava : ...तर आमची सरकारला साथ असेल; शरद पवारांनी दिली ग्वाही

"पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांच्या 14 चालक या महिला आहेत. महिलांना संधी देण्याचं काम महायुतीचं सरकार करत आहे," असंही अजित पवार म्हणाले.

ajit pawar
Manoj Jarange Vs Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com