Satej Patil VS Mahadik group Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil VS Mahadik : 'प्रगती बघून बंटी घाबरलाय!', महाडिक गटाने सतेज पाटलांना डिवचले

Rahul Gadkar

Kolhapur News : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातील महाडिक गट आणि सतेज पाटील गट पुन्हा एकदा आमने-सामने आला आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाडिक गट आक्रमक झाला आहे. सभास्थळी विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात थेट बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांनीच अनेक सवाल उपस्थित केले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे वादळी होण्याची शक्यता आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्या ताब्यात आहे. तर विरोधी गट म्हणून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आहेत. कारखाना सभास्थळाबाहेर सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्या गटाने परस्पर विरोधी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. सभेच्या प्रवेशद्वाराजवळच सतेज पाटील गटाच्या सभासदांनी सतेज पाटील यांची प्रतिमा असणारे डिजिटल फलक घेऊन उभे आहेत. तर या परिसरात अमल महाडिक यांच्या सभासद कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्या विरोधात अनेक बॅनर्स लावले आहेत.

सतेज पाटलांचे मनसुबे उधळले

कोल्हापूर लोकसभा, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ, गोकुळ दूध संघ निवडणुकीत महाडिक गटाला पराभूत केल्यानंतर आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी महाडिक गटाकडे असणारा छत्रपती राजाराम कारखाना विरोधात लढा सुरू ठेवला. महाडिक गटाच्या विरोधात पॅनल उभा करत सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. मात्र महाडिक गटांनी या कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा विजयाचा वारू रोखला.

जिल्ह्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना आहे जिथे महाडिक गटाची सत्ता अबाधित आहे. पाटील गटांनी हे केंद्र देखील आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्याला यश आले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महाडिक गट आणि पाटील गट हा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात उभा ठाकणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT